विना परवानगीने सुरू झाले ‘एअरटेल’चे भुयारी खोदकाम

By admin | Published: September 8, 2015 12:01 AM2015-09-08T00:01:39+5:302015-09-08T00:01:39+5:30

‘रिलायन्स’ कंपनीने ४-जी इंटरेनट सेवा पुरविण्यासाठी जागोजागी खोदकाम करुन शहरात खड्ड्यांचे जाळे निर्माण केले असताना ...

Airtel's underground excavation started without permission | विना परवानगीने सुरू झाले ‘एअरटेल’चे भुयारी खोदकाम

विना परवानगीने सुरू झाले ‘एअरटेल’चे भुयारी खोदकाम

Next

पदाधिकारी अनभिज्ञ : गाडगेनगर पोलिसात फौजदारीसाठी तक्रार
अमरावती : ‘रिलायन्स’ कंपनीने ४-जी इंटरेनट सेवा पुरविण्यासाठी जागोजागी खोदकाम करुन शहरात खड्ड्यांचे जाळे निर्माण केले असताना आता ‘एअरटेल’ कंपनीने महापालिकेची परवानगी न घेताच केबल टाकण्यासाठी भुयारी खोदकाम केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या खासगी मोबाईल कंपनीविरुध्द गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत महापालिका पदाधिकारी देखील अनभिज्ञ असल्याची माहिती आहे.
सद्यस्थितीत ‘रिलायन्स’ कंपनीचे भुयारी केबल टाकण्यासाठी शहरात खोदकाम सुरु आहे. यामुळे आधीच शहर खड्डेमय झाले आहे. हे खड्डे बुजविण्याची प्रक्रिया अद्याप सुरु झाली नाही. अशात ‘एअरटेल’ कंपनीने ‘४-जी’ इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भुयारी केबल टाकण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी कंपनीने पहिल्या टप्प्यात गाडगेनगर भागातून खोदकाम सुरु केले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने हे खोदकाम नियमबाह्य ठरते. याच कारणाने महापालिकेच्या बांधकाम विभागाने गाडगेनगर पोलिसांत धाव घेऊन ‘एअरटेल’ कंपनीविरूध्द दोन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दिली आहे.

Web Title: Airtel's underground excavation started without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.