अकारण झालेल्या वादात अजयने गमावला जीव; दोघांना अटक

By प्रदीप भाकरे | Published: December 29, 2023 01:40 PM2023-12-29T13:40:59+5:302023-12-29T14:05:58+5:30

इर्विन चौकात खून : दोन आरोपींना अटक, दोन फरार

Ajay lost his life in an unprovoked dispute; Both were arrested | अकारण झालेल्या वादात अजयने गमावला जीव; दोघांना अटक

अकारण झालेल्या वादात अजयने गमावला जीव; दोघांना अटक

अमरावती : स्थानिक इर्विन चौकातील चहा कॅंटिनसमोर एका ३० वर्षीय तरूणाला अकारण जीव गमवावा लागला. २८ डिसेंबर रोजी रात्री १.३० च्या सुमारास ती घटना घडली. अजय विठ्ठल कंगाले (३०, रा. समाधाननगर) असे मृताचे नाव आहे. त्याच्या पोटात चाकू भोसकण्यात आला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी पहाटे आरोपी नवनीत संतोष पवार, उज्वल चव्हाण, आकाश सुरोसे (तिघेही रा. हमालपुरा) व आकाश हरले (रा. गाडगे नगर) यांच्याविरूध्द खून, खुनाचा प्रयत्न व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पैकी उज्वल चव्हाण व व आकाश सुरोसे यांना अटक करण्यात आली.
            
या प्रकरणी, अरविंद आबरावजी इंगोले (४०, केवल कॉलनी अमरावती) याने तक्रार नोंदविली. या घटनेत अरविंद देखील गंभीर जखमी झाला. अरविंद हा त्याच्या मित्रासोबत दारू पिण्याकरीता करण बार येथे गेला असताना आरोपी नवनीत पवार तेथे आला. त्याने अकारण अरविंदला शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. तो वाद अरविंदच्या मित्रांनी सोडवला. त्यानंतर अरविंद हा मित्रांसमवेत तेथून निघून पुढे एका बिअर शॉपीमध्ये जाऊन दारू पिले. अरविंदचा मित्र योगेश चोरे तिथून निघून गेला. रात्री १.३० च्या सुमारास अरविंद इंगोले, सचिन सदावर्ते व अजय कंगाले हे इर्विन चौकातील रसूल यांच्या चहा कॅन्टिनवर आले. ते आपसात बोलत असताना तेथे आरोपी नवनीत पवार, आकाश हरले, आकाश सुरोसे व उज्वल चव्हाण हे त्यांच्या दुचाकीने आले. आकाश हरले याने अजय कंगाले व अरविंदच्या पायाला तसेच हातावर लोखंडी रॉड मारला. तर उज्वल चव्हाण व आकाश सुरोसे यांनी अजय कंगाले याला पकडून ठेवले. नवनीत संतोष पवार याने अजय कंगाले याच्या पोटात चाकू भोसकला.
 

Web Title: Ajay lost his life in an unprovoked dispute; Both were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.