दारुच्या दुकानासमोर संत्रा रसाचे वाटप!
By admin | Published: January 11, 2016 12:13 AM2016-01-11T00:13:07+5:302016-01-11T00:13:07+5:30
व्यसनाधिनता आणि तळीरामांचे वाढते प्रमाण यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याला आळा घालण्याकरिता ...
विदर्भ आॅरेंज ग्रुपचा उपक्रम : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वरुड : व्यसनाधिनता आणि तळीरामांचे वाढते प्रमाण यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याला आळा घालण्याकरिता विदर्भातील संत्र्याला भाव देण्याकरिता विदर्भ आॅरेंज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आठवडी बाजारात देशी दारुच्या दुकानासमोर संत्रा रसाचे वाटप करून दारुबंदीची मागणी केली.
वरुड तालुका विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून परिचित आहे. या भागात संत्र्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. संत्रा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे हालबेहाल आहे. दारुचे महागडे भाव असतानाही मोठ्या प्रमाणावर खप वाढला, तर व्यसनाधिनतासुध्दा वाढली आहे. तळीरामांनी दारूऐवजी संत्रा रस प्राशन करावा आणि दारुबंद करावी याकरिता विदर्भ आॅरेंज ग्रुपचे संस्थापक शेषराव घोडेरावसह देवेंद्र बोडखे, बाळू पाटील, नितीन सिनकर, हेमंत देशमुख, राजेंद्र वसुले, विशाल शेरेकर, अमित जयस्वाल, बाबाराव भोंड, लोकेश अग्रवाल, उमेश बहुरुपीसह संत्रा उतपदक शेतकरी, युवा व्यापारी संघटना, पत्रकार आदी उपस्थित होते. दारुच्या व्यसनाधीन झालेल्या मुळे सामाजिक, कौटुंबिक कलहामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.
तळीरामांचे संसार वाचले पाहिजेत म्हणून दारूबंदी करण्यात यावी , दारु ऐवजी फळांचा रस प्राशन करावा आणि शेतकऱ्याने उतपदन केलेल्या शेतमालाला भाव मिळावा याकरीता दारुच्या दुकानासमोर आठवडी बाजारात जावून संत्रा रसाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगारकीांनी प्रचंड प्रतिसाद देत संत्रा रसाचे प्राशन केले आणि अनेकांनी दारु सोडण्याचा संकल्प सुध्दा केल्याचे शेषराव घोडेराव यांनी सांगितले. हा अभिनव उपक्रम विदभर् आॅरेंज ग्रुपच्या वतीने करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)