जिल्ह्यात दारुचा महापूर
By admin | Published: October 13, 2014 11:15 PM2014-10-13T23:15:36+5:302014-10-13T23:15:36+5:30
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात अवैध दारु विक्रीला उधाण आले आहे. त्या अनुषंगाने कारवाईच्या दृष्टीने पोलीस व उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात अवैध दारु विक्रीला उधाण आले आहे. त्या अनुषंगाने कारवाईच्या दृष्टीने पोलीस व उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज ७ ते ८ कारवाई होत आहेत. त्यामुळे अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १० पोलीस ठाण्यांतर्गत अवैध दारु विक्रेत्यावर पोलिसांची करडी नजर आहे. शनिवारी व रविवारी दिवसभरात पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून हजारो रुपयांची अवैध दारु जप्त केली आहे. राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवाथेनगर चौकात आरोपी भय्यालाल किसनलाल हटवार (४५, रा. देशपांडे प्लॉट) याच्याकडून पोलिसांनी २४ नग देशी दारुच्या पावट्या जप्त केल्यात. तर चिचफैल भागात आरोपी विशाल रमेश कोरटकर याच्याकडून विदेशी दारुचा २० हजार ५० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. शहर कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चित्रा चौकात आरोपी अब्दुल कलीम अब्दुल सत्तार (४५, रा. हबीब नगर) व शेख इरफान शेख अयुब (२०, रा. खुर्शीदपुरा) याच्याकडून पोलिसांनी ४८ नग विदेशी दारुच्या पावट्या जप्त केल्या. राजकमल चौकात आरोपी मुस्तफा राजू चौधरी (२६, रा. फे्र जरपुरा) याच्याकडून ४८ नग देशी दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्यात. शाम चौकात आरोपी राजेश प्रकाश जाधव यांच्याकडून ४८ देशी दारुच्या बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टाकरखेडा संभू येथे आरोपी नरेश गणपत पाटील याच्याकडून पोलिसांनी १२ नग देशी दारुच्या बॉटल जप्त केल्या. तसेच नांदुरा येथे आरोपी अशोक नथ्थुजी इंगळे (४७, रा. थूगाव पिंपरी) याच्याकडून पोलिसांनी १९ नग देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु विक्रीला उधाण आल्याने ही कारवाईची मोहिम पोलीस विभागाकडून राबविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)