ग्रामपंचायत निवडणुकीत वाहणार दारूचे पाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:02 AM2021-01-05T04:02:18+5:302021-01-05T04:02:18+5:30
तळेगाव दशासर : येत्या १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये दारूचे पाट वाहण्याची शक्यता वर्तविली ...
तळेगाव दशासर : येत्या १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये दारूचे पाट वाहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी दारूचे साठा केले जात असल्याची चर्चा आहे. परिणामी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.
गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण थंडीतही तापायला सुरुवात झाली आहे. जसजसे निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत, तसतसा गावागावांत निवडणुकीचा रंग चढणार आहे. परंतु, या रंगाचा बेरंग होणार नाही, याची काळजी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात अनेक जणांकडून दारूचा साठा केला जात आहे. आतापासूनच दारूच्या पेट्या गावात नेऊन त्या सुरक्षित ठेवल्या जात आहेत. संभाव्य ग्रामपंचायतची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. पॅनेलच्या तयारीने वेग घेतला आहे. निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार यात शंकाच नाही. निवडणूक शांततेत पार पाडाव्यात, ही सर्वांचीच अपेक्षा आहे. त्यासाठी गावागावांत अवैध दारू पोहचणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या आहेत तेव्हापासून पार्सलद्वारे दारू पोहचवली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगाचा बेरंग होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक जण कामाला लागले आहेत. परंतु काही जण वातावरण निर्मितीसाठी दारूचा आधार घेत असल्याची चर्चा ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.
-----------