५६१ एसटी चालकांची अल्कोहोल चाचणी; वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी महामंडळाचा पुढाकार 

By जितेंद्र दखने | Published: September 1, 2023 06:15 PM2023-09-01T18:15:04+5:302023-09-01T18:15:35+5:30

चालक मद्यपान करून कर्तव्य बजावत असल्याची प्रकरणे आढळल्याने एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी नाराजी व्यक्त केली होती.

Alcohol testing of 561 ST drivers; Corporation's initiative to curb the increasing incidence of accidents | ५६१ एसटी चालकांची अल्कोहोल चाचणी; वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी महामंडळाचा पुढाकार 

५६१ एसटी चालकांची अल्कोहोल चाचणी; वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी महामंडळाचा पुढाकार 

googlenewsNext

अमरावती : 'सुरक्षित प्रवास' हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळातील काही चालक-वाहक मद्यप्राशन करून काम करत असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने वाहतूक खाते, सुरक्षा आणि दक्षता खाते संयुक्तपणे दोन दिवस मद्यपान तपासणी मोहीम राबविणार आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला ही मोहीम राबविण्यात आली आहे.यामध्ये गुरूवारी विभागातील ५६१ एसटी चालकांची अल्कोहोल टेस्ट करण्यात आली. अचानक तपासणी न करता या मोहिमेची घोषणा करण्यात आल्याने ही मोहीम पारदर्शकपणे कशी राबवली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चालक मद्यपान करून कर्तव्य बजावत असल्याची प्रकरणे आढळल्याने एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी नाराजी व्यक्त केली होती. महामंडळात बहुतांशी आगारात अल्कोटेस्ट मशीन दिल्या असतांना स्थानकावर तसेच मार्गतपासणी दरम्यान मद्यपान करणाऱ्या चालकांची तपासणी करण्याबाबत सूचना देखील आहेत. परंतु तरीही कामगिरीवरील चालकांनी मद्यपान केल्याचे अनेकदा आढळून येत आहे. त्यामुळेच ही मद्यपान तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी विभाग नियंत्रकांना दिले होते. यात १०० टक्के मद्यपान तपासणी करण्यासाठी २ दिवसांची मोहिम राबवावी अशा सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सुरक्षा व दक्षता शाखा व वाहतूक शाखा यांच्यासह संयुक्त तपासणी मोहीम एसटीच्या अमरावती विभागात गुरुवारी पहाटे ५.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ५६१ चालकांची अल्कोहोल चाचणी करण्यात आली. 

अपघातांवर नियंत्रणासाठी महामंडळाचा पुढाकार
एसटीच्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही चाचणी एसटी महामंडळाद्वारे अमरावती विभागातही चाचणी करण्यात आली.यानुसार अमरावती मध्यवर्ती बसस्थानकांवर १२३, राजापेठ बसस्थानकांवर ४०, परतवाडा ७०, वरुड ६३, मोर्शी ९८, चांदूर बाजार ५७ ,चांदूर रेल्वे ४५, दर्यापूर ६५ अशा एकूण ५६१ बस चालकांच्या चाचण्या करण्यात आल्या.

अमरावती विभागासह अन्य कुठल्याही विभागातील बस स्थानकावरून ज्यो बसेस जातील त्यांच्या प्रत्येक चालकांची अल्कोहोल चाचणी घेण्यात आली.ही मोहीम यापुढेही सुरू ठेवली जाईल.
निलेश बेलसरे,विभाग नियंत्रक अमरावती

Web Title: Alcohol testing of 561 ST drivers; Corporation's initiative to curb the increasing incidence of accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.