‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात अलर्ट, वन्यजीवांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना

By गणेश वासनिक | Published: September 20, 2022 07:18 PM2022-09-20T19:18:54+5:302022-09-20T19:19:55+5:30

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह अभयारण्यातील वन्यजीवांबाबतही ‘लम्पी’ या संसर्गाने शिरकाव करू नये, यासाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना टिप्स देण्यात आल्या आहेत.

Alert in tiger reserve in wake of 'Lumpi', instructions to monitor wildlife in amravati | ‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात अलर्ट, वन्यजीवांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना

‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात अलर्ट, वन्यजीवांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना

Next

अमरावती - राज्यात जनावरांना ‘लम्पी’ या संसर्गाने ग्रासल्यामुळे आतापर्यत हजारो पशू दगावले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांना युद्धस्तरावर लसीकरण दिले जात आहे. मात्र, ‘लम्पी’ हा व्याघ्र प्रकल्पात पोहोचू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. वाघ, बिबट, हरीण, काळवीट, रानगवा आदी वन्यजीवांपर्यंत हा संसर्ग पोहोचणार नाही, याबाबत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह अभयारण्यातील वन्यजीवांबाबतही ‘लम्पी’ या संसर्गाने शिरकाव करू नये, यासाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना टिप्स देण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पानजीकची गावे, खेड्यातील भटक्या श्वानांवर करडी नजर ठेवली आहे. ‘लम्पी’ या संसर्गाने दगावलेल्या पशुंच्या संपर्कातील भटकी श्वान, शेळी वा मेंढी ही व्याघ्र प्रकल्पात जाणार नाही, याबाबत व्याघ्र प्रकल्पाने दक्षता घेतली आहे. व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट्याच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवल्या जात आहे. 

वन्यजीवांवर त्वचा रोग वा कातडीवर वेगळे काही डाग तर नाही ना? याबाबत ट्रॅप कॅमेऱ्यातून तपासले जात आहे. त्याकरिता पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत वन विभाग घेत आहे. ताडोबा, मेळघाट, बोर, टिपेश्वर, काटेपूर्णा, पेंच, ज्ञानगंगा, सह्याद्री आदी अभयारण्यात ‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर अलर्ट करण्यात आले आहे.

भटकी श्वान, ‘लम्पी’ संसर्ग जनावरे लक्ष्य

व्याघ्र प्रकल्प असो वा अभयारण्य असो या भागात गाव, खेड्यातून येणाऱ्या भटक्या श्वानांवर वन कर्मचारी करडी नजर ठेवून आहेत. व्याघ्र प्रकल्पात कळत नकळत भटक्या श्वानांचा आतमध्ये प्रवेश होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.  व्याघ्र प्रकल्पांच्या सीमेवर गस्त वाढविली आहे. तसेच ‘लम्पी’ संसर्गाने ग्रासलेल्या जनावरांवरही पाळत ठेवली जात आहे. 

राज्यात जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. ही बाब गंभीर असून, व्याघ्र प्रकल्पात हा संसर्ग पोहोचू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. वाघ, बिबट, हरीण, काळवीट, रानगवा यासह अन्य वन्यजीवांना बाधा होणार नाही, यासाठी वन कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
 

Web Title: Alert in tiger reserve in wake of 'Lumpi', instructions to monitor wildlife in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.