सत्ता स्थापनेचा मुद्दा, पोलिसांना अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:50+5:30

विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा मुद्दा रखडला आहे. सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरणात घमासान चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात निश्चित कालावधीपूर्वी सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्तविली आहे.

Alert the police, issue of establishment of power | सत्ता स्थापनेचा मुद्दा, पोलिसांना अलर्ट

सत्ता स्थापनेचा मुद्दा, पोलिसांना अलर्ट

Next
ठळक मुद्देक्राईम मिटिंग : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभेचा निकाल लागूून दहा दिवस ओलांडलेत. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. येत्या आठवड्यात होऊ घातलेला अयोध्येतील राममंदिर व बाबरी मशिदीचा मुद्दा, पीएमसी बँक घोटाळा, अवकाळी पावसामुळे शेती पिके बुडाली, त्यांची आंदोलने, या सर्व पार्श्वभूमीवर गृहविभागाकडून अमरावती पोलिसांनीही सजग राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. सोमवारी पोलीस आयुक्तालयात आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांची बैठक बोलावण्यात आली. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी पोलीस निरीक्षकांना यासंबंधी सजग राहण्याच्या सूचना केल्यात.
विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा मुद्दा रखडला आहे. सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरणात घमासान चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात निश्चित कालावधीपूर्वी सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्तविली आहे. त्या अनुषंगानेही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्ता स्थापन न झाल्यास काय? यावर जनसामान्यांची नजर रोखली आहे. याबाबत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात संदेश व्हायरल होऊ लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. दरम्यान अयोध्या येथील मंदिर-मशिदीचा मुद्दाही सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यामुळे बँक वर्तुळात प्रचंड खळबळ आहे. बँकेतील पैसे काढून घ्या, इतपत संदेश व्हायरल केले जात आहे.
या घडामोडींच्या अनुषंगाने सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांचा बाजार पाहता विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. यासंबंधाने गृहविभागाकडून पोलिसांना सूचना प्राप्त झाल्याची माहिती पुढे येत आहे.

पोलिसांच्या सुट्टा रद्द
विधानसभा निवडणुकीत पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या होत्या. दिवाळीनंतर पोलिसांना सुट्या देण्यात आल्या. २५ ते ३० टक्के पोलीस सुटीवर गेले होते. मात्र, आता आगामी सण-उत्सवात ईद, गुरुनानक जयंतीनिमित्त पोलिसांना शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज राहावे लागणार आहेत. त्यातच सत्ता स्थापनेचा पेच व अयोध्येचा मुद्दा पुढे असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस महासंचालकाच्या आदेशाचे संदेश पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसू लागले आहेत. त्यामुळे ज्यांना सुटी घ्यायची होती, ते पोलीस आता चिंतेत पडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू असल्याचे बोलले जात आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका
सोशल मीडिया, व्हाट्सअ‍ॅप समूहावर सत्ता स्थापनेविषयी व अयोध्येत राम मंदिर व बाबरी मशिद या मुद्द्यावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. या संदेशावर व अफवांवर विश्वास ठेवू नका, आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन तयारीत असून, जनसामान्यांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी केले आहे.

Web Title: Alert the police, issue of establishment of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस