पूर्णा प्रकल्पाची सर्व दारे २० सेंमीने उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:09 AM2021-07-23T04:09:53+5:302021-07-23T04:09:53+5:30

ब्राह्मणवाडा थडी : पाच किमी अंतरावरील विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पाची सर्व नऊ दारे २२ जुलैला दुपारी १२ वाजता ...

All the doors of the entire project opened by 20 cm | पूर्णा प्रकल्पाची सर्व दारे २० सेंमीने उघडली

पूर्णा प्रकल्पाची सर्व दारे २० सेंमीने उघडली

Next

ब्राह्मणवाडा थडी : पाच किमी अंतरावरील विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पाची सर्व नऊ दारे २२ जुलैला दुपारी १२ वाजता २० सेंमीने उघडण्यात आले. पूर्णा नदीचे उगमस्थळ असलेल्या भैसदेही येथे २४ तासांमध्ये १९३ मिमी पाऊस झाल्याने धरणामध्ये पाण्याची आवक वाढणार असल्याने ही कार्यवाही केल्याची माहिती उपविभागीय अभियंता अनूप खवणे, कनिष्ठ अभियंता अक्षय ईरजकर यांनी दिली.

प्रकल्पामधील २२ जुलै रोजी संकल्पित एकूण साठा ४२.७५ दलघमी असून, संकल्पित जिवंत साठा ३५.३७ दलघमी आहे. आजची पाणीपातळी ४४८.३८ मीटर असून, जिवंत साठा २०.९८१९ दलघमी इतका आहे. जिवंत साठ्याची टक्केवारी ५९.३२ एवढी आहे. धरणामधून १२३ घनमीटर/से असा विसर्ग सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रातील भैसदेही मंडळात १९३ मिमी, सावलमेंढा येथे १२ मिमी, बापजेई येथे १० मिमी, तर विश्रोळी महसूल मंडळात १७ मिमी पाऊस झाला.

Web Title: All the doors of the entire project opened by 20 cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.