आठही आमदारांकडे शेती, बैल बारदाना; दोन अल्पभूधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 05:00 AM2022-02-17T05:00:00+5:302022-02-17T05:00:49+5:30

जिल्ह्यात सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांची पाठ असून पारंपारिक पिके व त्याच पद्धतीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. कमी उत्पादन खर्चाची ही पद्धत अजूनही शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडलेली नाही. त्यामूळे रासायनिक खते, कीटकनाशकांचा अमर्याद वापर होऊन जमिनीचा पोत खराब होत असल्याची बाब मृदा परीक्षणातून समोर आलेली आहे.

All eight MLAs have agriculture, bullock carts; Two minority holders | आठही आमदारांकडे शेती, बैल बारदाना; दोन अल्पभूधारक

आठही आमदारांकडे शेती, बैल बारदाना; दोन अल्पभूधारक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : जिल्ह्यातील आठही  आमदारांकडेशेती आहे. सामाजिक कार्यातून सवड मिळाल्यानंतर ते शेतातही फेरफटका मारतात. या सर्व लोकप्रतिनिधींची नाळ अद्यापही शेतीशी जुळली असल्याने बळीराजाच्या व्यथा ते चांगल्या पद्धतीने समजू शकतात. 
 अद्याप सेंद्रीय शेतीकडे फारसा कल दिसून आलेला नाही. मात्र, काहींनी सेंद्रिय शेतीलाही प्राधान्य दिले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर सवड मिळताच शेतात जातात. आमदार सुलभा खोडके यांच्या शेतात टिश्यू कल्चरचा प्रोजेक्ट आहे. कंपनीद्वारा तीन ते चार दिवसांची रोपे देण्यात येतात व महिनाभरात वाढ झाल्यानंतर त्याच कंपनीद्वारा ही रोपे विकत घेतल्या जातात. 

सेंद्रिय शेतीकडे पाठ
जिल्ह्यात सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांची पाठ असून पारंपारिक पिके व त्याच पद्धतीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. कमी उत्पादन खर्चाची ही पद्धत अजूनही शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडलेली नाही. त्यामूळे रासायनिक खते, कीटकनाशकांचा अमर्याद वापर होऊन जमिनीचा पोत खराब होत असल्याची बाब मृदा परीक्षणातून समोर आलेली आहे.

सवड मिळताच शिवारात
जिल्ह्यातील आमदार सामाजिक कार्यात व्यस्त असतानाही सवड मिळताच शेतात फेरफटका मारतात. त्यासोबतच उपस्थित शेतकरी व शेतमजूर यांच्याशी संंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत असल्याचे बहुतांश जणांनी सांगितले. 

यशोमती ठाकूर ३० एकराच्या धनी
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मोझरीत ३० एकर शेती आहे. यात जिरायती व बागायती पिके घेतली जातात, त्यांचे काका शेती पाहतात. 

सुलभा खोडके यांच्या तीन एकरात सिमला
आमदार सुलभा खोडके यांच्या नावे बोरगाव येथे तीन एकर शेती आहे. यात सिमला मिरची तसेच टिश्यू कल्चर रोप (स्टेन गन) प्रकल्प आहे. 

बच्चू कडू यांच्याकडे वडिलोपार्जित १२ एकर 
 अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्याकडे बेलोरा येथे वडिलोपार्जित १२ एकर शेती आहे. सवड मिळताच ते शेतात फेरफटका मारतात. 

पटेल यांच्याकडे पाच एकर जिरायती
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांची झिल्पी येथे  वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. पारंपारिक पिकालाच प्राधान्य देतात.

देवेंद्र भुयार यांच्याकडे दीड हजार संत्रा झाडे
मोर्शी-वरुडचे आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे गव्हाणकुंड येथे वडीलोपार्जित १५ एकर शेती आहे. त्यामध्ये दीड हजार संत्राची झाडे आहेत. 

प्रताप अडसड यांच्या १६ एकरात पारंपारिक पिके
धांमणगावचे आमदार प्रताप अडसड यांची मूर्तिजापूर तरोडा येथे १६ एकर शेती आहे. ते पेरणीच्या वेळी अनेकदा बैलजोडी हाकतात, 

वानखडे यांच्याकडे ४० एकर जिरायती
दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्याकडे लेहेगाव येथे वडिलोपार्जित ४० एकर जिरायती शेती आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू हे सध्या शेती सांभाळतात.

रवि राणा साडेतीन एकर शेतीचे धनी 
 बडनेराचे आमदार रवि राणा यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. यामध्ये पारंपरिक व सेंद्रिय पद्धतीने पिके घेतली जातात. 

 

Web Title: All eight MLAs have agriculture, bullock carts; Two minority holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.