सपनचे चारही दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:56 AM2019-07-31T00:56:35+5:302019-07-31T00:57:07+5:30
अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पात ८२ टक्के जलसंचय झाला आहे. धरणात पाण्याची आवक ५०.७२ घनमीटर प्रतिसेकंद सुरू आहे. धरणातील पाण्याची पातळी ५११.०५ मीटर झाल्यामुळे ३० जुलैला सपन धरणाचे चारही दरवाजे १० सेमीने दुपारी १ वाजता उघडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पात ८२ टक्के जलसंचय झाला आहे. धरणात पाण्याची आवक ५०.७२ घनमीटर प्रतिसेकंद सुरू आहे. धरणातील पाण्याची पातळी ५११.०५ मीटर झाल्यामुळे ३० जुलैला सपन धरणाचे चारही दरवाजे १० सेमीने दुपारी १ वाजता उघडण्यात आले.
धरणाचा पहिला व चौथा दरवाजा २९ जुलैला प्रत्येकी ५ सेमीने उघडण्यात आला होता. मात्र, गेल्या २४ तासांत धरणातील पाण्याची पातळी वाढतच गेल्यामुळे ३० जुलैला सर्व दरवाजे १० सेमीने प्रकल्प अधिकाऱ्यांनी उघडले होते. धरणात वाढत असलेली पाण्याची पातळी आणि जलसाठ्यावर शाखा अभियंता गौरव आवनकर व उपविभागीय अभियंता सुबोध इंदूरकर, कार्यकारी अभियंता उ.ज. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात लक्ष ठेवून आहेत. धरणातील पाणीपातळी शेड्यूलनुसार आॅगस्टच्या शेवटी पाण्याची पातळी ५११ मीटर निर्धारित असते.
प्रकल्पावर सहा दिवसांत ३६२ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजपर्यंत एकूण ५१९ मिमी पाऊस पडला आहे. आॅगस्टमधील पाण्याची पातळी जुलैमध्येच प्रकल्पाने गाठली. काही दिवसांत प्रकल्प पूर्ण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.