पूर्णा प्रकल्पची नऊही दारे उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:29+5:302021-09-06T04:16:29+5:30
मध्यप्रदेश मध्ये झालेल्या अतिपावसमुळे जलसाठ्यात वाढ पान ३ लीड फोटो - पूर्णा ०५ पी चांदूर बाजार : मध्य प्रदेशांत ...
मध्यप्रदेश मध्ये झालेल्या अतिपावसमुळे जलसाठ्यात वाढ
पान ३ लीड
फोटो - पूर्णा ०५ पी
चांदूर बाजार : मध्य प्रदेशांत झालेल्या अतिपावसामुळे पूर्णा प्रकल्पातील पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शनिवारी रात्री या प्रकल्पाची सर्व नऊ दारे ३० सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून पूर्णा नदीपात्रात २४१.५६ घनमीटर/सेकंद पाण्याचा विसर्ग सोडण्यात होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या पूर्णा मध्यम प्रकल्पामध्ये मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे परिणाम होतो. त्यानुसार गेल्या दोन दिवसात मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पूर्णा प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये मध्य प्रदेशमधील सावलमेंढा मंडळात १२० मिमी, तर भैसदेही मंडळात २६ मिमी पाऊस झाला. त्याचा ओघ प्रकल्पाकडे आहे. या प्रकल्पात संकल्पित जिवंत पाण्याचा साठा ३५.३७ दशलक्ष घनमीटर असून पाण्याची पातळी ४५१.६१ मीटर आहे. धरणात ९४.८४ टक्के जलसाठा आहे. पूर्णा प्रकल्पामधून शनिवारी रात्री ९ वाजता संपूर्ण नऊही दारे ३० सेंटिमीटरने उघडण्यात आली. यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढली असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
050921\img-20210722-wa0094.jpg
पुरणा मध्यम प्रकल्प