सर्वच गरिबांना हक्काची घरे मिळणार

By admin | Published: January 15, 2016 12:27 AM2016-01-15T00:27:08+5:302016-01-15T00:27:08+5:30

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेतून आता सर्वच गरिबांना हक्काची पक्की घरे मिळणार आहेत.

All the poor will get the right of houses | सर्वच गरिबांना हक्काची घरे मिळणार

सर्वच गरिबांना हक्काची घरे मिळणार

Next

अमरावतीचा समावेश : तीन ते सहा लाख रुपयांपर्यत कर्ज अनुदान
अमरावती : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेतून आता सर्वच गरिबांना हक्काची पक्की घरे मिळणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने दोन लाखांचे अनुदान तर तीन ते सहा लाख रुपयांपर्यत कर्जावर आधारित अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी अमरावती शहराची निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाने पंतप्रधान आवास योजना ‘सर्वांसाठी घरे-२०१६’ ही योजना राबविण्यासाठी मंजुरी प्रदान केली आहे. त्याअनुषंगाने ९ जानेवारी रोजी शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे. ही योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी बुधवारी मुंबई मंत्रालयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री सुभाष देसाई यांनी महापालिका, जिल्हा परिषद व नगरपरिषदांचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नागरी भागासाठी राबविल्या जाणाऱ्या या योजनेविषयीची माहिती देताना ना. देसाई यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करुन तातडीने मंजुरी करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीला अमरावती महापालिकेच्या महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, नगरसेविका निलिमा काळे उपस्थित होत्या. योजनेसाठी राज्यात झोपडपट्टी असलेल्या शहरांची निवड करण्यात आली आहे.

असे आहे निकष
या योजनेसाठी लाभार्थ्यांना प्रतिवर्ष आर्थिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना ३० चौरस मिटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी तीन लाख रुपये तर अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना ६० चौरस मिटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी तीन ते सहा लाख रुपयांपर्यत कर्ज पुरवठा केला जाईल.

Web Title: All the poor will get the right of houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.