विद्यापीठात सर्वपक्षीय धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:24 PM2017-09-18T22:24:56+5:302017-09-18T22:25:28+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी .....

All-rounder in the university | विद्यापीठात सर्वपक्षीय धडक

विद्यापीठात सर्वपक्षीय धडक

Next
ठळक मुद्देपरीक्षा विभागाच्या अनागोंदीवर आक्षेप : ‘माइंड लॉजिक’ ‘ब्लॅकलिस्ट’ करा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी सोमवारी विद्यापीठात धडक दिली. परीक्षा संचालकांचे निलंबन तर माइंड लॉजिक एजन्सीला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याची मागणी करण्यात आली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अन्यायग्रस्त विद्यार्थी कृती समितीच्या बॅनरखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, रिपाइं या प्रमुख राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाºयांनी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांची भेट घेतली. त्यांच्या समक्ष समस्या, प्रश्न मांडताना विद्यार्थ्यांसह पदाधिकाºयांनी परीक्षा विभागाचे संचालक जयंत वडते यांना लक्ष्य केले.
परीक्षा विभागात अनागोंदी सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप नगरसेवक प्रशांत डवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केला.
नाकारलेल्या एजन्सीला कंत्राट
परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामकाजाची जबाबदारी माइंड लॉजिक एजन्सीकडे सोपविण्याबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला. या एजन्सीमुळे अभियांत्रिकी पेपरच्या निकालात घोळ असल्याची कैफियत वैभव राऊत या विद्यार्थ्यांनी मांडली. पुनर्मुल्यांकनात एकाच पेपरमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना १७ गुण कसे मिळाले. त्यामुळे खरेच पुनर्मूल्यांकन होत काय, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. परीक्षा विभागाचे संचालक वडते यांच्यावर कठोर कारवाई तर मार्इंड लॉजिक एजन्सीला ‘ब्लॅक लिस्ट’ करावे, अशी आग्रही मागणी रेटण्यात आली.
दरम्यान मयुराताई देशमुख यांनी वसतिगृहात मुली असुरक्षित असल्याची बाब कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. पीएचडी ‘पेट’ परीक्षेचा मुद्दाही मांडण्यात आला. युवासेनेचे राहुल माटोडे यांनी निकालाचा घोळ थांबला नाही तर वरिष्ठांच्या खुर्चीपर्यत धाव घेऊ, असा निर्वाणीचा इशारा दिला. यावेळी कुलगुरु मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख आदींनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी काँग्रेसचे प्रकाश साबळे, प्रशांत डवरे, राजा बांगळे, बबलू बोबडे, सागर देशमुख, नितीन ठाकरे, संजय मापले, मनसेचे संतोष बद्रे, शाम धाने, जिजाऊ ब्रिगेडच्या मयुराताई देशमुख, रणजित तिडके, अनिकेत ढेंगळे, संकेत कुलट, युवासेनेचे राहुल माटोडे, रितेश पांडव, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे ऋषिकेश वैद्य, आकाश हिवसे, युवा स्वाभिमानचे अभिजीत देशमुख, समीर देशमुख आदींनी विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्यात.
विद्यापीठाने परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामाची जबाबदारी बंगळूरु येथील माइंड लॉजिक एजन्सीकडे सोपविली आहे. मात्र, याएजन्सीला गुजरात राज्यात नाकारले असताना अमरावती विद्यापीठाने कसे स्वीकारले, असा सवाल उपस्थित करण्यात आला. मुंबई, नागपूर विद्यापीठाने सुद्धा माइंड लॉजिकला हाकलून लावल्याची बाब मांडण्यात आली. कंत्राट प्रक्रियेत बरेच काही दडले असून चौकशी केल्यास बरेच तथ्य बाहेर येईल, असे कुलगुरु चांदेकर यांना सांगितले.
- तर विद्यार्थ्यांच्या रक्ताक्षराने निवेदन
विद्यापीठात परीक्षा विभागात गैरकारभार करणाºया दोषींवर कठोर कारवाईसह माइंड लॉजिक या एजन्सीला ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी २४ सप्टेंबरपर्यंत कुलगुरुंनी पूर्ण करावी, अन्यथा २५ सप्टेंबरला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांचे रक्तदान शिबिर घेऊन कुलगुरुंना रक्ताक्षराने निवेदन सादर केले जाईल, असे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, नगरसेवक प्रशांत डवरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

परीक्षा विभागाशी संबंधित समस्यांबाबत शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, ही काळजी घेत निर्णय होईल. माइंड लॉजिक एजन्सी नेमण्याचा प्रकार यापूर्वीच झाला आहे.
-मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

Web Title: All-rounder in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.