‘आपले सरकार’ पोर्टलवर सर्व सेवांचे एकत्रीकरण
By admin | Published: July 14, 2017 12:42 AM2017-07-14T00:42:50+5:302017-07-14T00:42:50+5:30
राज्याचा सेवा हमी कायदा क्रांतिकारक आहे. नागरिकांना शासकीय सेवा विहित कालमयार्देत देण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे.
स्वाधीन क्षत्रिय : लोकसेवा हक्क आयोगाची कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याचा सेवा हमी कायदा क्रांतिकारक आहे. नागरिकांना शासकीय सेवा विहित कालमयार्देत देण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. कायद्यामुळे नागरिकांना सेवा मिळविण्यासोबतच त्यांचे सक्षमीकरणही होणार असल्याने राज्यात कायद्याची प्रभावी अमंलबजावणी व्हावी, साठी सर्व शासकीय यंत्रणांनी व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी विभागस्तरीय लोकसेवा हक्क आयोग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच.वाकडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, महाआॅनलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद कोलते, उपसचिव संजय काटकर उपस्थित होते.
राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘आपले सरकार’ आणि महाआॅनलाईन यासारखे सेवा देणारे पोर्टल उपलब्ध आहे. पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणारी सेवा अधिसूचित केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासनाच्या सेवा आपले सरकार या वेबपोर्टलच्या माध्यमातून एका प्लॅटफार्मवर आणण्यात येणार आहे. त्यामुळे कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी लागेल, असे ते म्हणाले.
नागरिकांच्या सुविधेसाठी आरटीएस महाराष्ट्र नावाचे मोबाईल अॅप उपलब्ध करण्यात आले आहे. अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारे माहिती देण्यासाठी विलंब केल्यास कारवाई आणि दंड ठोठावण्यात येणार आहे. नायब तहसीलदार निकिता जावरकर यांनी संचालन, तर पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर यांनी आभार मानले.