सर्व दुकाने रात्री आठला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:37 AM2021-02-20T04:37:14+5:302021-02-20T04:37:14+5:30
अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने सोमवार ते शुक्रवार या काळात रात्री आठ वाजता बंद करण्याचा ...
अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने सोमवार ते शुक्रवार या काळात रात्री आठ वाजता बंद करण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व व्यवहार दर आठवड्यातील शनिवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी 8 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश यापूर्वीच जारी आहे. आता सोमवार ते शुक्रवार दरम्यान रोज सर्व दुकाने रात्री आठला बंद होतील. त्यानुसार अमरावती शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स. चहा-नाश्ता उपाहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पानटपरी, इतर वस्तूंची दुकाने, सिनेमागृहे, उद्याने, पर्यटनस्थळे रात्री आठला बंद होतील.
या आदेशातून सर्व औषधे विक्री दुकाने, रुग्णालये, प्रसृतीगृहे, कदवाखाने, वैद्यक प्रयोगशाळा, रुग्णवाहिका आदी सेवांना वगळण्यात आले आहे.
-------