दर्यापूरच्या आमदारांविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:11 AM2020-12-23T04:11:20+5:302020-12-23T04:11:20+5:30

अंजनगाव सुर्जी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना आमदार बळवंत वानखडे यांनी १८ डिसेंबर रोजी शहरातील सिद्धेश मंगलम् ...

Allegation of violation of code of conduct against MLAs of Daryapur | दर्यापूरच्या आमदारांविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप

दर्यापूरच्या आमदारांविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप

Next

अंजनगाव सुर्जी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना आमदार बळवंत वानखडे यांनी १८ डिसेंबर रोजी शहरातील सिद्धेश मंगलम् येथे ५०० ते ६०० आशा, अंगणवाडी सेविकांसोबत भाऊबीज कार्यक्रम घेतला. त्यात महिलांना साडी-चोळी व ‘बळवंत वानखडे’ असे मुद्रित बॅग वाटण्यात आली. हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची तक्रार रिपाइंचे तेजस अभ्यंकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदारांकडे केली आहे.

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या मानधन तत्त्वावर व ग्रामीण भागात कार्यरत असताना व सद्यस्थितीत ग्रामीण भागात निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना, आमदारांनी घेतलेला कार्यक्रम हे आचारसंहितेचे उल्लंघन व निवडणूक काळात भेटवस्तू देऊन प्रलोभन देण्याचा प्रकार असल्याचा आरोप अभ्यंकर यांनी केला आहे

------------

Web Title: Allegation of violation of code of conduct against MLAs of Daryapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.