आदिवासी बांधवाच्या उपस्थितीत युतीचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:21 AM2019-04-01T01:21:26+5:302019-04-01T01:22:25+5:30
लोकसभा मतदारसंघातील मेळघाट विधानसभा क्षेत्रात धारणी येथे रविवारी शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले) गटाचा मेळावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याला आदिवासी बांधवांसह युतीचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
अमरावती : लोकसभा मतदारसंघातील मेळघाट विधानसभा क्षेत्रात धारणी येथे रविवारी शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले) गटाचा मेळावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याला आदिवासी बांधवांसह युतीचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
मेळाव्याला मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार पटल्या गुरुजी मावस्कर, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, अमरावती लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक गजू कोल्हे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुनील चौथमल, सुनील साळवी, भाजप तालुकाध्यक्ष आप्पा पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शैलेश मालवीय, राजू मालवीय, दयाराम सोनी, अनिल मालवीय व मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना, भाजप, रिपाइं (आठवले) गटाचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आजवर केलेल्या पाठपुराव्याची माहिती आनंदराव अडसूळ यांनी दिली. याला उपस्थित आदिवासी बांधवांनी भरभरून दाद दिली. मेळघाटातील आरोग्य सेवा, कुपोषण रोजगाराचे प्रश्न, रोजगार यासह विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू, अशी ग्वाही अडसुळ यांनी दिली.