सभापतींना खाते वाटप

By admin | Published: April 19, 2017 12:11 AM2017-04-19T00:11:30+5:302017-04-19T00:11:30+5:30

सोमवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह दोन विषय समितींच्या सभापतींना खात्यांचे वाटप करण्यात आले.

Allocation of accounts to the Speaker | सभापतींना खाते वाटप

सभापतींना खाते वाटप

Next

जिल्हापरिषद विषय समिती : वित्त-वानखडे, बांधकाम-देशमुख, कृषी-ढोमणे
अमरावती : सोमवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह दोन विषय समितींच्या सभापतींना खात्यांचे वाटप करण्यात आले. यात उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्याकडे कृषी व पशुसंर्वधन खाते सोपविण्यात आले, तर जयंत देशमुख यांच्याकडे बांधकाम व शिक्षण खाते तर बळवंत वानखडे यांच्याकडे वित्त व आरोग्य समितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात मंगळवारी दुपारी १ वाजता विशेष सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, महिला व बालकल्याण सभापती वनिता पाल, समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे यांची उपस्थिती होती. या सभेत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याचा पदभार उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्याकडे, तर बांधकाम व शिक्षण विभागाचा कारभार जयंत देशमुख आणि आरोग्य व वित्त खात्यांचा पदभार बळवंत वानखडे यांच्याकडे देण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्षांनी केली.
दरम्यान या सभेच्या प्रारंभी अध्यक्षांनी स्थायी समिती, जलव्यवस्थापन समितीची जबाबदारी ही नियमानुसार अध्यक्ष यांच्याकडे असल्याचे प्रशासनाने जाहीर केले याशिवाय महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण या खात्याचा पदभार हा अनुक्रमे वनिता पाल आणि सुशीला कुकडे यांच्याकडे दिल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

असे आहे खाते वाटप
दत्ता ढोमणे कृषी व पशुसंवर्धन
जयंत देशमुखशिक्षण व बांधकाम
बळवंत वानखडेवित्त व आरोग्य

खात्यांमध्ये झाले बदल
मागील जिल्हा परिषदेच्या सभागृहात उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांच्याकडे असलेले आरोग्य व वित्त खात्यांचा पदभार होता. आता उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन विभागाचा पदभार आला आहे. काँग्रेसचे जयंत देशमुख यांना अपेक्षेप्रमाणे बांधकाम व शिक्षण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सभेचे सचिव जाहीर
जिल्हा परिषदेच्या दहा विषय समित्यांच्या सचिवपदांच्या नियुक्तीचा ठराव मंजूर केला आहे. यामध्ये स्थायी, जलव्यवस्थापन समितीचे सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, बांधकाम समितीचे सचिव म्हणून राजेंद्र डोंगरे, कृषी उदय काथोडे, आरोग्य नितीन भालेराव, पशुसंर्धन समिती पुरूषोत्तम सोळंके, समाजकल्याण भाऊराव चव्हाण, शिक्षण एस.एम पानझाडे, महिला व बालकल्याण डेप्युटी सीईओ कै लास घोडके, वित्त समितीचे मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे आदीची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह विषय समितींच्या सभापतींना नियमानुसारच खाते वाटप करण्यात आले. खाते वाटपाचा निर्णय सर्वांच्या समन्वयातून घेण्यात आला. सभा बोलविण्यासंदर्भाचा अधिकार हा अध्यक्षांचाच आहे.त्यामुळे विरोधकांची मागणी ही अयोग्यच आहे.
- बबलू देशमुख,
गटनेता काँग़्रेस

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना खाते वाटप जर सोमवारी केले जात आहे तर १५ एप्रिल रोजीची स्थायी समितीची सभा कशी काय बोलावली, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे
- रवींद्र मुंदे, सदस्य, भाजप

पदाधिकाऱ्यांना खाते वाटप करण्यासाठी आतापर्यंत निवडणूक घेण्याची पद्धत आहे. त्यानुसार यावेळी उपाध्यक्षांसह सभापतींना खाते वाटप करण्यासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली. मात्र बहुमताच्या जोरावर यावर सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले, ही बाब योग्य नाही.
- प्रताप अभ्यंकर, सदस्य

Web Title: Allocation of accounts to the Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.