दुष्काळनिधीचे वाटप बाकी
By admin | Published: February 7, 2015 12:11 AM2015-02-07T00:11:39+5:302015-02-07T00:11:39+5:30
जिल्ह्यातील साडेचार लाख अल्प, अत्यल्प व बहुभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाखांचा निधी ...
अमरावती : जिल्ह्यातील साडेचार लाख अल्प, अत्यल्प व बहुभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाखांचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे गुरुवारी सर्व तालुक्यांना वितरित केला. मात्र ८ जानेवारीला प्राप्त पहिल्या टप्यामधील निधीतील रक्कम तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही जमा झालेला नाही. अचूक याद्या नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
अपुऱ्या पावसामुळे खरीप २०१४ चा हंगाम उध्वस्त झाला. जिल्ह्यात पैसेवारी ५० पैश्याच्या ात ४६ पैसे आहे. त्यामूळे जिल्ह्यात १४ तालुक्यामधील १९८१ गावामध्ये शासनाचे दुष्काळ स्थिती घोषित केली. त्यामूळे जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांना सोई सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्यात दुष्काळ निधीसाठी ३०२ कोटी ५१ लाख रुपयांची आवश्यकता असतांना ८ जोनवारी २०१५ ला १२५ कोटी ७९ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला. व दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी ५ फेब्रूवारीला सर्व तालुक्याला वितरीत करण्यात आला. असा एकूण ८० टक्यांचा २५१ कोटी ६३ लाखाचा निधी सर्व तालुक्याला वितरीत करण्यात आला. मात्र पहिल्या टप्यातील निधीचे केवळ ८१ ते ८३ टक्केच वितरीत झाल्याचा अहवाल आहे. प्रत्यक्षात यापेक्षा कमी प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा झाला आहे. एका पेक्षा अधिक गावांचा तलाठ्यांकडे असनारा अधिभार, याद्या अचूक नसने, शेतकऱ्यांचे वारंवार बदलनारे बँक खाते क्रमांक आदी कारणामुळे काही गावामधील शेतकऱ्यांच्या हा निधी मिळू शकलेला नाही.