जिल्हाधिकार्‍यांना मेळघाटचे आवतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:27+5:302021-07-21T04:10:27+5:30

फोटो पी २० मंगरोळे चिखलदरा : अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या मेळघाटातील विकासात्मक कामासह महत्त्वाचा मुद्दा असलेला रोजगार आणि शासनाच्या ...

Allotment of Melghat to the Collector | जिल्हाधिकार्‍यांना मेळघाटचे आवतन

जिल्हाधिकार्‍यांना मेळघाटचे आवतन

Next

फोटो पी २० मंगरोळे

चिखलदरा : अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या मेळघाटातील विकासात्मक कामासह महत्त्वाचा मुद्दा असलेला रोजगार आणि शासनाच्या योजना असताना त्या खऱ्या लाभार्थ्यांना मिळवण्यासाठी वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. विविध समस्या निवारणासाठी मेळघाटचा लवकरच अभ्यासपूर्वक आपण दौरा करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या भेटीदरम्यान केली.

मेळघाटात अनेक समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रशासनात कार्य करणारे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी ते कार्यकर्ते सर्व प्रयत्नशील आहेत. मात्र, आदिवासी युवकांना शासनाच्या विविध योजनांतून रोजगार उपलब्ध करून दिल्यास आर्थिक समस्येतून त्यांना बळकटी येणार असल्याचे जि.प. सदस्य वासंती मंगरोळे यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर त्यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले. नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागतही मेळघाटवासीयांतर्फे त्यांनी केले.

कुपोषित बालक, गरोदर माता, पोषण आहार

अंगणवाडीतून गरोदर माता, कुपोषित बालकांना व्यवस्थित पोषण आहार मिळावा, मेळघाटातील सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात शेळीपालन, कुक्कुटपालनसारखे व्यवसाय सुरू करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

बॉक्स

लसीकरणावर भर द्यावा

मेळघाटातील आदिवासी कुठल्याही आजारावर सोयीस्कर दवाखान्या उपचार घेण्याऐवजी ते गावातील भूमकाजवळ जातात. अंधश्रद्धेत गुरफटलेल्या आदिवासींना कोरोनासारख्या महमारीत लसीकरण घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कॅम्प घेणे जरुरी असल्याचा मुद्दा प्रकर्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे वासंती मंगरोळे यांनी मांडला.

200721\img-20210719-wa0080.jpg

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत पवार यांच्याशी चर्चा करताना जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे

Web Title: Allotment of Melghat to the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.