घरकूल बांधकामासाठी वाळू द्या, अन्यथा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:03 PM2019-02-04T23:03:55+5:302019-02-04T23:04:18+5:30
मुख्यमत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने नियमानुसार ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोमवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे धामणगाव मतदार संघातील विविध गावांच्या सरपंचांनी निवेदनाव्दारे केली. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुख्यमत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने नियमानुसार ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोमवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे धामणगाव मतदार संघातील विविध गावांच्या सरपंचांनी निवेदनाव्दारे केली. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील शासकीय घरकुल मंजूर लाभार्थ्यांना शासन धोरणानुसार घरकुल बांधकामाकरिता ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, यासंदर्भात आमदार वीरेंद्र जगताप यांनीे पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत कारवाईचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. परंतु अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. अशातच झेडपी मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत घरकुलाचे कामे पूर्ण करावेत, असा तगादा लावला आहे. विहित मुदतीत घरकुल पूर्ण न झाल्यास लाभार्थ्यांना अनुदान देण्यास अडचणी निर्माण होतील. जीएसटी कपात घेऊन एक लाख रूपयांतून बाजारमूल्याने ४० हजार रुपये वाळूसाठी लागणार आहेत. परिणामी, घरकुलाचे काम होऊ शकणार नाहीत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार कारवाई करावी. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी सदर मागणीसाठी जिल्हाधिकाºयांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह रवी बिरे, अतुल ठाकूर, सुनील इंझळकर, ज्योतीपाल चवरे, अब्दूल जुनेद, अनिल भोयर, अमीरभाई, रमेश ठाकरे आदी सरपंच व सहकाºयांनी दिला आहे.
भंडारा येथे आदेश, मग येथे का नाहीत?
शासनाच्या धोरणाप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामसाठी भंडारा येथील जिल्हा प्रशासनाने ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा, तहसील प्रशासनाने दिले आहेत. मग अमरावती जिल्ह्यातच का घरकुलांचे लाभार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यास वेळकाढू धोरण का राबविले जात आहे, असा प्रश्न आमदार वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.