मध्यप्रदेशातून रॉयल्टीसह रेती आणण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:01+5:302021-03-19T04:13:01+5:30
धारणी : मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांतर्गत घरकुलधारकांसह बांधकाम आणि खासगी बांधकाम करणाऱ्यांना लगतच्या मध्यप्रदेशातून रेती आणण्याची परवानगी द्यावी, ...
धारणी : मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांतर्गत घरकुलधारकांसह बांधकाम आणि खासगी बांधकाम करणाऱ्यांना लगतच्या मध्यप्रदेशातून रेती आणण्याची परवानगी द्यावी, अन्यथा नाईलाजास्तव सत्याग्रहाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिला. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनासुद्धा या गंभीर विषयाबाबत अवगत करण्यात आले. लवकरच तोडगा न निघाल्यास नाईलाजास्तव जनतेसाठी मला सत्याग्रह करावा लागेल, अशी आग्रही भूमिका राजकुमार पटेल यांनी गुरुवारी मांडली. सध्या उन्हाळा लागला असून, लोकांनी घरकुलाच्या आशेने आपले राहते घर तोडले असून, त्यांचे संसार उन्हात उघड्यावर आले आहे. रेतीअभावी घरकुलाचे काम पूर्णपणे बंद असल्याने लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
पान ३ साठी