धातू सोबत ति देत आहे जीवनालाही आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:45+5:302021-03-22T04:12:45+5:30

जिल्हास्तरीय ऊशु स्पर्धा चांदुर रेल्वे : स्थानिक विरुळ चौकात आपल्या कुटुंबासोबत धातूंवर घन चालविणाऱ्या सृष्टी ने आपले हात मजबूत ...

Along with metal, it is also shaping life | धातू सोबत ति देत आहे जीवनालाही आकार

धातू सोबत ति देत आहे जीवनालाही आकार

Next

जिल्हास्तरीय ऊशु स्पर्धा

चांदुर रेल्वे : स्थानिक विरुळ चौकात आपल्या कुटुंबासोबत धातूंवर घन चालविणाऱ्या सृष्टी ने आपले हात मजबूत करीत शालेय फाईट स्पर्धेत ही आपल्या हाताची ताकद दाखविली आहे,

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथील वर्ग १०वी ची विद्यार्थिनी सृष्टी प्रकाश पवार हिने नुकतेच जिल्हा स्तरीय वुशू फाईट स्पर्धा ४० वजन गटातील महिला प्रवर्ग मधे सिल्वर मेडलची मानकरी ठरली आहे.

सृष्टी पवार ही विद्यार्थिनी मूळ यवतमाळची असून गेल्या 3 वर्षांपासून रोजगाराच्या शोधात चांदुर रेल्वे इथे आपल्या कुटुंबासोबत आली आहे, मामा सुभाष पवार यांच्या लोह कामात ती मदत करते अतिशय गरीब परिस्थितीत सृष्टी शिक्षणाची जिद्द ठेऊन आहे, शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात तिची कामगिरी चांगली असून मागे झालेल्या मॉरोथान स्पर्धेत ती तालुक्यातून प्रथम आली असल्याचे कळते, नुकतेच पोलीस विभागातर्फे अमरावती येथे झालेल्या जिल्हा स्तरीय ऊशु फाईट स्पर्धेत तिने सिल्वर मेडल मिळविले आहे. या क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कुल तर्फे शिक्षक व मुख्याध्यापिका शिला लोखंडे यांचे विळोवेळी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत असते

--------------

सृष्टी पवार ही वर्ग 10 वितील विद्यार्थिनी असून तिची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, परंतु अभ्यासासोबत क्रीडा स्पर्धेत सृष्टी ची कामगिरी उत्तम आहे, भविष्यात तिला चांगले मार्गदर्शन व मदत मिळाल्यास ती एक उत्कृष्ठ खेळाडू बनू शकते.

-मुख्याध्यापिका शिला लोखंडे,

Web Title: Along with metal, it is also shaping life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.