झेडपी परिसरात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विकले आलू पोंगे अन भजी; संपाचा २९ वा दिवस
By जितेंद्र दखने | Published: November 22, 2023 08:37 PM2023-11-22T20:37:01+5:302023-11-22T20:37:59+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्तेत आल्यानंतर शासकीय आरोग्य सेवेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते.
अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी बुधवारी जिल्हा परिषद परिसरात आलू पोंगे आणि भजी काढून त्यांची विक्री करत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्तेत आल्यानंतर शासकीय आरोग्य सेवेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतरही त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. पुन्हा एकदा ते सत्तेत आहेत, परंतु मागील २९ दिवसांपासून कंत्राटी अधिकारी, कर्मचारी हे आपल्या न्याय अधिकारासाठी आंदोलन करत असतानादेखील त्याची साधी दखल शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनास सुरु केली आहेत. २२ नोव्हेंबर रोजी कंत्राटी आरोग्य कर्मचान्यांनी जिल्हा परिषद परिसरात गॅसवर पोंगे आणि भजी काढत शासनाचे मागण्याकडे लक्षवेधण्याची आंदोलन केले. यावेळी मोनाली खंडारे, राधिका पखाले,पूजा चौहान,प्रीती पवार,डॉ पवन धाकडे,मोनाली खंडारे,डॉ मंगेश चौगुले,मनोज सहारे,अमोल गुल्हाने, सुषमा तायडे,रवी चंन्द्रे,मनीष पिंजरकर, मनिष हटवार: योगेश मानकर,योगेश मोकदम,राहुल खांनपासोडे,राहुल मालखेडे आदीसह शेकडोच्या संख्येने कंत्राटी अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले