'आधीच अडीच वर्षे राज्याचे नुकसान झालंय', नवनीत राणांची दोन्ही नेत्यांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 03:39 PM2022-11-03T15:39:49+5:302022-11-03T15:40:45+5:30

अमरावती - अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला पोहचला आहे. विशेष म्हणजे ...

Already two and a half years Maharashtra state has lost, Navneet Rana's request to both the leaders bachhu kadu and ravi rana | 'आधीच अडीच वर्षे राज्याचे नुकसान झालंय', नवनीत राणांची दोन्ही नेत्यांना विनंती

'आधीच अडीच वर्षे राज्याचे नुकसान झालंय', नवनीत राणांची दोन्ही नेत्यांना विनंती

Next

अमरावती - अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला पोहचला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. तरीही, राणा विरुद्ध कडू यांच्यातील वाद पुन्हा समोर आला आहे. बच्चू कडूंनी जाहीर सभेतून टीका केल्यानंतर राणांनीही दम भरला. त्यानंतर, आमदार रवि राणा यांनीही प्रत्युत्तर देत बच्चू कडूंना थेट आव्हान दिलं. त्यामुळे, पुन्हा एकदा दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी आता प्रथमच खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केलं आहे.  

राणा विरुद्ध कडू यांच्यातील वादावर खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. रवी राणा व बच्चू कडू यांना दोघांनाही त्यांनी विनंती केली आहे, ''आधीच अडीच वर्ष राज्याचे नुकसान झाले आहे, आता सक्षम सरकार आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे दोघांनी एकत्रित यायला पाहिजे, आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावा. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपले मतभेद बाजूला ठेवा,'' अशी विनंती नवनीत राणा यांनी दोघांना केली. पती रवि राणा यांनाही एकप्रकारे त्यांनी आवाहनच केलं आहे. त्यामुळे, लवकरच या वादावर आता पडद पडण्याची शक्यता आहे.        

काय म्हणाले बच्चू कड़ू

रवि राणा यांच्यासोबतच्या वादावर बोलताना कडू म्हणाले की, माध्यमांनी हा वाद वाढवू नये, सभेत मी शाळांबाबत चांगलं बोललो होतो, ते नाही दाखवलं पण वादाचं तेवढं दाखवलं. आमच्याकडून हा वाद नाही थांबला, तर मीडियाने थांबवलं पाहिजे. मीडियाने चांगले विषय घ्यावेत, असेही कडू यांनी म्हटले. मी राणांचे आभार मानले, ते दोन पावलं मागे येत असतील तर मी ४ पाऊलं मागे येईल, असेही मी सभेत बोललो. मी आत्ता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जात आहे. माझ्या मतदारसंघातील प्रकल्पाला सुप्रिमा दिली. त्यामुळे, मतदारसंघातील २० हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानायला जात आहे, असेही कडू यांनी म्हटले. 

राणा हा विषय नॉर्मल आहे, मी काही चौथ्या वर्गातील विद्यार्थी नाही. त्याने दिलगिरी व्यक्त केली, मीही आभार मानले, आता हा विषय संपल्याचे कडू यांनी म्हटले. त्यानंतर, राणा यांनी केलेल्या विधानासंदर्भात बोलताना, ते म्हणाले मी फूल घेऊन येतो, मी म्हणतो त्यांनी तलवार घेऊन यावे. ५ आणि ६ तारखेला मी घरीच आहे. त्यांनी कोणते कोणते तुकडे पाहिजे माझे, हात पाहिजे की पाय. माझं मुंडकं पाहिजे असेल तर तिथं कापावं मला, अशा शब्दात कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाले होते रवी राणा?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे बच्चू कडू यांच्यासोबतचा वाद मिटला आहे. पण लक्षात घ्या, कुणी मला दम देत असेल तर रवी राणाने उद्धव ठाकरेंचाही दम खाल्ला नाही. बच्चू कडू काहीच नाही. जर कडू दम देत बोलत असेल तर कुठल्याही स्तरावर मी उत्तर देईन. तो ज्या स्तरावर बोलेल त्यावर उत्तर देईन. प्रेमाच्या भाषेपुढे रवी राणा एकदा नाही तर दहावेळा झुकेल. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायचीही हिंमत आहे असा इशारा आमदार रवी राणांनी दिला होता.  

त्याचसोबत मंत्री बनणं हा माझा अधिकार नाही. माझे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान ठेवत मी २ पाऊलं मागे आलो. दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यात कुणाचेही मन दुखायला नको म्हणून मी तो विषय तिथेच संपवला. पण वारंवार मला कुणी दम देत असेल मी रवी राणाला माफ करणार नाही म्हटलं. तुला कुणी सांगितले माफ करायला? तुझ्यात जेवढी हिंमत असेल तू कसा निवडून येतो पाहा. वेळ सांगेल बच्चू कडू पुन्हा आमदार निवडून येतो की नाही असंही रवी राणांनी म्हटलं आहे.

Web Title: Already two and a half years Maharashtra state has lost, Navneet Rana's request to both the leaders bachhu kadu and ravi rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.