चिखलदरा येथे माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:41+5:302021-07-11T04:10:41+5:30

------------- माळी समाजातील सरपंच, उपसरपंचांचा आज सत्कार अमरावती : वऱ्हाड विकासच्यावतीने सर्वशाखीय माळी समाजातील सरपंच, उपसरपंच व कोविडयोद्धा यांचा ...

Alumni Gathering at Chikhaldara | चिखलदरा येथे माजी विद्यार्थी मेळावा

चिखलदरा येथे माजी विद्यार्थी मेळावा

Next

-------------

माळी समाजातील सरपंच, उपसरपंचांचा आज सत्कार

अमरावती : वऱ्हाड विकासच्यावतीने सर्वशाखीय माळी समाजातील सरपंच, उपसरपंच व कोविडयोद्धा यांचा सत्कार ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. श्रीकृष्ण बनसोड, प्रभाकर वानखडे, ओमप्रकाश अंबाडकर, भरत खासबागे, नंदकिशोर वाठ, मोर्शीच्या नगराध्यक्ष मेघना मडघे, पंचायत समिती सभापती वीणा बोबडे, उपसभापती सोनाली नवले, जिल्हा परिषद सदस्य वंदना करुले, पूजा हाडोळे, बबनराव पाटील, अरुण कांडलकर, हर्षद जावरकर आदी मान्यवर उपस्थित राहतील.

--------------

रवाळा नाका येथे कंटेनरचालक ठार

शेंदूरजनाघाट : रवाळा येथील आरटीओ नाक्यावर वाहन तपासणीकरिता यूपी ८५ सीटी ०१९७ क्रमांकाच्या कंटेनरचा चालक खाली उतरला असता रिव्हर्स येत असलेल्या एचआर ७४ बी ९४१३ क्रमांकाच्या वाहनाची त्याला धडक बसली. जखमी चालकाचे उपचारादरम्यान निधन झाले. ७ जुलै रोजी ही घटना घडली. शेंदूरजनाघाट पोलिसांनी ९ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.

-------------

हिवरखेड येथून मुलाला फूस लावून पळविले

मोर्शी : तालुक्यातील हिवरखेड येथील मुलाने कॅटरिंगचे काम करण्यासाठी मोर्शी येथे जात असल्याचे सांगितले. ५ जुलै रोजी तो घराबाहेर पडला. तेव्हापासून घरी परतला नाही. त्याच्या पालकांनी त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मोर्शी पोलीस ठाण्यात ९ जुलै रोजी नोंदविली.

Web Title: Alumni Gathering at Chikhaldara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.