आमनेरच्या आरोग्य केंद्राला जिल्ह्यात प्रथम पुरस्कार
By admin | Published: February 8, 2017 12:20 AM2017-02-08T00:20:22+5:302017-02-08T00:20:22+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून आता देशातील आरोग्य केंद्रातील सुविधेकडे लक्ष केंद्रित केले.
कायाकल्प योजना : आरोग्य सेवेत उत्कृष्ट, गोरगरिबांची झाली सोय
वरूड : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून आता देशातील आरोग्य केंद्रातील सुविधेकडे लक्ष केंद्रित केले. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत कायाकल्प योजनेतून ज्या अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राची दशा पालटविली. अशा आरोग्य केंद्रांना केंद्र सरकारकडून पारितोषिक दिले जाते. यामध्ये अमरावती जिल्हयातील प्राथमिक स्वास्थ केंद्रातून वरुड ताूलक्यातील आमनेर प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हास्तरीय दोन लाख रुपयाचा प्रथम पुरस्कार मिळाला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून देशातील ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, आरोग्य सेवा, साफसफाई आदी विषयाबाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य केंद्राना पारितोषिक देण्यात येते. सर्व्हेक्षणाअंती अमरावती जिल्ह्यातून वरुड तालूक्यातील आमनेर प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हास्तरीय दोन लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आमनेर प्राथमिक स्वास्थ्य केंद्र सुसज्ज असून रुग्णसेवा दिली जाते. येथील वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख आरोग्य सेवा, रुग्ण सुरक्षा तसेच कर्मचारी, परिसर स्वच्छता, सुसज्ज गार्डन, रुगण्वाहिका, टाकाऊ वैद्यकीय सामग्रीकरिता विशेष सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अनेक सुविधांमुळे आरोग्य केंद्र अत्याधुनिक असून कायाकल्प योजने अंतर्गत या सुविधा लोकवर्गणीतून अमोल देशमुख यांनी करुन घेतल्या. या प्रकल्पांची दखल घेत कायाकल्प योजने अंतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवेचा जिल्हास्तरीय दोन लाख रुपयांचा पुरस्कार नुकताच घोषित झाला असल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)