अंबानगरी चौफेर अतिक्रमणात

By Admin | Published: February 16, 2016 12:02 AM2016-02-16T00:02:58+5:302016-02-16T00:02:58+5:30

अपूर्वा देऊळगावकरच्या अपघाताने अख्खे समाजमन हळहळले आणि उपाययोजनांचा रतीब घालायला सुरुवात झाली.

Ambanagari Chaufar encroachment | अंबानगरी चौफेर अतिक्रमणात

अंबानगरी चौफेर अतिक्रमणात

googlenewsNext

ट्रॅफिक सेन्सही गरजेचा : सांघिक पुढाकाराची गरज
प्रदीप भाकरे अमरावती
अपूर्वा देऊळगावकरच्या अपघाताने अख्खे समाजमन हळहळले आणि उपाययोजनांचा रतीब घालायला सुरुवात झाली. या उपाययोजना सुरूच राहायला हव्यात. त्यात खंड पडायला नको. सोबतच सांघिक प्रयत्न आणि वाहतुकीचे नियोजनही हवे. ट्रॅफिक सेन्सही हवा, तेव्हाच अंबानगरी अतिक्रमणमुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ शकेल.
वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले जातात तर कुठेही वाहने पार्क केली जातात. अबानगरीवासियांना मोकळा श्वास घ्यायचा असेल तर सर्वप्रथम अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागायला हवा. तत्पूर्वी कागदोपत्री असलेले पार्किंग/नोपार्किंग झोन आणि हॉकर्स झोन प्रत्यक्षात उतरले पाहिजेत. अतिक्रमणधारकांवर महापालिकेकडून कारवाई केले जाते. मात्र दोन तीन दिवसानंतर पुढचे पाढे पंचावन्न होतात. या रस्त्यावर थाटलेल्या अतिक्रमणाने रस्ते अरुंद झालेत. अरुंद रस्त्याने अपघातात वाढ झाली. अतिक्रमणाची समस्या मुळापासून उपटून काढण्यासाठी महापालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राजकीय दूरदृष्टीच्या समन्वयाची गरज आहे. अतिक्रमण हटविल्यास वाहतुकीला आपोआपच दिशा मिळेल. (प्रतिनिधी)

अवैध पार्किंग असलेली संकुले
प्रियदर्शनी मार्केट
बग्गा मार्केट
कापूस बाजार संकुल
आदर्श हॉटेल
ईगल हॉटेल
रिलायंस ट्रेन्डस
पटेल मार्केट
महापालिका संकुल
गुलशन आर्केड
गुलशन प्लाझा
राजापेठलगतचे संकुल
जयस्तंभ चौक

येथे फिरवा गजराज


नगर वाचनालयासमोरचा भाग
राजकमल ते अंबादेवी मार्ग
गांधी चौक ते टांगापाडाव
चित्रा चौक व्हाया इतवारा ते चांदणी चौक
वलगाव मार्ग ते नागपुरी गेट
ट्रान्सपोर्टनगर
जयस्तंभ ते राजकमल
शाम चौक पदपथ
बापट चौक पदपथ
राजकमल चौकातील व्यावसायिक संकुल
मजिप्राची संरक्षण भिंत
गांधी चौक ते अंबागेट
मोर्शी रोडवरील व्यावसायिक संकुले
उड्डाणपुलाशेजारी लागणाऱ्या हातगाड्या
पंचवटी ते गाडगेनगर
गाडगेनगर - शेगाव नाका
बाजार समिती मार्ग
आरटीओ चौक
शेगाव नाका ते आशिया कॉलनी
नवाथे स्टॉपवरील फुडझोन
प्रशांतनगर गार्डनजवळचे फुडझोन
जिल्हाधिकारी सेतू परिसर
- जवाहर मार्ग
जयस्तंभ ते
रायली प्लॉट
राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय
बसस्थानक मार्ग
रेल्वे स्टेशन ते इर्र्विन
इर्विन परिसर
डफरिन परिसर
डी-मार्ट/दोन्ही
रुक्मिणीनगर मार्ग
शिकवणी वर्ग
हॉटेल रामगिरीलगतचा भाग
चुनाभट्टी परिसर
राजापेठ ठाण्यानजीकचा भाग

Web Title: Ambanagari Chaufar encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.