-तर आंबेडकर जयंतीदिनी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 10:48 PM2018-04-08T22:48:39+5:302018-04-08T22:48:39+5:30
बडनेरा नवी वस्तीस्थित पोलीस ठाण्यासमोरील समता चौकात गत ४० वर्षांपूर्वी नगरपरिषदेत पारित ठरावानुसार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शनिवार, १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीदिनी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. रवी राणा यांच्यासह पुतळा स्थापना समितीने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा नवी वस्तीस्थित पोलीस ठाण्यासमोरील समता चौकात गत ४० वर्षांपूर्वी नगरपरिषदेत पारित ठरावानुसार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शनिवार, १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीदिनी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. रवी राणा यांच्यासह पुतळा स्थापना समितीने दिला आहे.
जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना आ. राणांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात बडनेरा शहरवासीयांनी भावना व्यक्त केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा साकारण्याची गत अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, प्रशासनाने यासंदर्भात दिरंगाई केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती असून, प्रशासनाने पुतळा बसविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा बडनेºयातील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असा निर्वाणीचा इशारा आ. राणांची जिल्हाधिकाºयांना दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पुतळा स्थापना समितीची कैफियत जाणून घेतली. निवेदन देताना आ. राणांसह सिद्धार्थ बनसोड, सुशांत मेश्राम, मधुकर साखरे, शेखर लांजेवार, विक्की शेंडे, दीपक वाहाणे, केतन देशपांडे, अजय जयस्वाल, दीपक निभोंरकर, शामराव येवोकार, पुंडलिक डोंगर अब्दुल आरिफ अब्दुल सलिम, शेख अयुब टेलर, सुरेंद्र चवरे, मंगेश चव्हाण, मो. रेहान, डी. बी. काळे, मधुकर वैद्य, स्वामिनाथन, सुभाष युवतकर, रंजित घरडे, आनंद पारसकर, मनोज अघोर, सुधाकर जांभुळकर, गणेश मराठे, दिपा वरघट, कमलेश नाईक, मीना बडगे, सुशीला तेलमोरे, विजय रामटेके, वंदना गोंडाणे, आरती शेलारे, नंदा रामटेके, राजा पंचारे, संजू पंचारे, निलू मेश्राम, ज्योती गोंडाने, तारा बडगे, रवींद्र ढवळे, अजय ढवळे, सुकन्या वासनिक, सोनल अडकने, शैलेश मेश्राम, राजेश चिमुटे, जुही चव्हाण, किशोर सवाई, सुनील इंगोले, अमोल तायडे आदी उपस्थित होते.