इर्वीन चौकातील आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण, बडनेरा शहर विकास

By Admin | Published: March 31, 2015 12:25 AM2015-03-31T00:25:39+5:302015-03-31T00:25:39+5:30

येथील इर्वीन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंडेकर पुतळा परिसर सांैदर्यीकरण/जागा अधिग्रहण आणि बडनेरा

Ambedkar statue beautification in Irwin Chowk, Badnera city development | इर्वीन चौकातील आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण, बडनेरा शहर विकास

इर्वीन चौकातील आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण, बडनेरा शहर विकास

googlenewsNext

दोन नवीन शिर्ष : महापौरांचा निर्णय
अमरावती:
येथील इर्वीन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंडेकर पुतळा परिसर सांैदर्यीकरण/जागा अधिग्रहण आणि बडनेरा शहराचा विकासाठी विशेष निधी असे नवीन दोन शिर्ष सोमवारी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेत मंजूर करण्यात आले आहे.
बडनेरा शहराचा विकास व्हावा, यासाठी भाजपचे तुषार भारतीय यांनी मनाचा मोठेपणा दाखवित नवीन शिर्ष निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. महापालिकेची निर्मिती करताना बडनेरा नगरपरिषद असताना समाविष्ट करण्यात आले नसते तर अमरावती महापालिकेची निर्मिती झाली नसती, ही बाब तुषार भारतीय यांनी पोटतिडकीने मांडली. महापालिकेचा अविभाज्य अंग असलेल्या बडनेरा शहराच्या विकासाठी सदस्य निधीची मागणी अथवा विकास कामांचा रेटा लावतात. मात्र, अपऱ्या निधीमुळे बडनेरा शहरात फारशी विकास कामे होत नाही. त्यामुळे प्रशासनाने बडनेरा शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी स्वतंत्र शिर्ष निर्माण केल्यास न्याय मिळेल, ही बाब भारतीय यांनी मांडली. त्यांच्या या मागणीला प्रकाश बनसोड, अविनाश मार्डीकर, चंदुमल बिल्दानी, विजय नागपुरे, छाया अंबाडकर, कांचन ग्रेसपुंजे, जावेद मेमन, जयश्री मोरे यांनी जोरदार प्रतिसाद दिला. तर स्थानिक इर्वीन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौदर्र्यींकरण/ जागा अधिग्रहण हे नवीन शिर्ष निर्माण करुन मागील काही दिवसांपृर्वीची मागणी पूर्ण करण्यात यावी, असे प्रदीप दंदे म्हणाले. १४ एप्रिल रोजी आंबेडकरांच्या जयंती दिनी शहरातील लाखो अनुयायी येथे येवून नतमस्तक होतात. या परिसरातील दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. येथे होणारी गर्दी बघता अपुऱ्या जागेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेता इर्वीन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौदर्यीकरण करुन नजीकची जागा अधिग्रहण करुन न्याय प्रदान करण्यात यावा, असे दंदे यांनी पोटतिडकीने मांडले. पुतळा परिसरातील जागा अधिग्रहीत केल्यास सौदर्यीकरणासह जागा वापरास मुभा मिळेल, असे ते म्हणाले.

Web Title: Ambedkar statue beautification in Irwin Chowk, Badnera city development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.