आंबियाचा संत्रा कवडीमोल

By admin | Published: November 10, 2015 12:26 AM2015-11-10T00:26:46+5:302015-11-10T00:26:46+5:30

विदर्भात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात आहे.

Ambiano's Orange Kawadimol | आंबियाचा संत्रा कवडीमोल

आंबियाचा संत्रा कवडीमोल

Next

व्यापारी फिरकेना : संत्रा उत्पादकांची दिवाळी अंधारात
संजय खासबागे  वरुड
विदर्भात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात आहे. सध्या आंबिया बहराच्या खरेदीसाठी व्यापारी फिरकले नसल्याने कोट्यवधींचा संत्रा बागेत पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.
वरुड तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार हेक्टर शेतजमीन आहे. उत्पादित संत्रा झाडे १७ हजार ६७१ हेक्टर ६७ आर जमिनीवर आहे. या परिसरात ३५ टक्क्यांपेक्षा अधिक जमिनीवर संत्राचे उत्पादन घेतले जाते. गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. जिल्ह्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादन केला जातो. यामध्ये साडेतीन लाख टन आंबिया बहराची संत्रा तर दोन लाख टन मृग बहराचे संत्रा उत्पादन घेतले जाते. तापमानात वाढ होत असल्याने संत्रा फळावर विपरीत परिणाम होऊन गळती सुरु आहे. यामुळे संत्रा उत्पादकांना अखेरची घरघर लागली आहे. ८०० ते एक हजार रुपये प्रतिहजार संत्राकरिता मोजावे लागते. मध्यम प्रतिच्या एका संत्रा झाडावर साधारणत: ८०० ते १२०० फळे असतात. एका झाडाच्या देखभालीचा आणि मशागतीचा खर्च बेगण्या लावणीपर्यंत ८०० ते एक हजार रुपये असल्याने मेहनत काढणेही कठीण झाले आहे. याच धर्तीवर संत्रासुध्दा हमी भावाने खरेदी करून वायनरी, रस प्रक्रिया केंद्र तसेच आदी उत्पादनांत वापर केल्यास बहुगुणी संत्राला चांगले दिवस येतील, अशी संत्रा उत्पादकांची अपेक्षा आहे. ऊसाप्रमाणे संत्रासुध्दा शासनाने २५ हजार रुपये प्रतिटन सरसकट खरेदी केल्यास शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील. आता संत्रा उत्पादक जागृत होऊन संत्राला हमी भावाने खरेदी करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. केवळ ५०० ते ८०० रुपयापर्यंत मागणी होत असल्यान मोठे नुकसान सहन करण्याची वेळ संत्रा उत्पादकांवर आली आहे.

Web Title: Ambiano's Orange Kawadimol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.