रुग्णवाहिका चालकांचा कोरोनाने मृत्यू; सायरन वाजवून अनोखी श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:24+5:302021-05-20T04:14:24+5:30
फोटो फोटो १९एएमपीएच२३, २४, २५ इर्विन ते हिंदू स्मशानभूमी दरम्यान १७ ते २० रुग्णवाहिकांचा होता समावेश अमरावती : खासगी ...
फोटो फोटो १९एएमपीएच२३, २४, २५
इर्विन ते हिंदू स्मशानभूमी दरम्यान १७ ते २० रुग्णवाहिकांचा होता समावेश
अमरावती : खासगी रुग्णवाहिका चालक संजय पुनसे (४५, रा. संजय गांधीनगर) यांचा बुधवारी कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. ही बाब शहरातील रुग्णवाहिका चालकांसाठी धक्कादायक ठरली. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शवविच्छेदनगृह ते हिंदू स्मशानभूमीपर्यंत सायरन वाजवीत रांंगेत १७ ते २० रुग्णवाहिका नेऊन सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभाग दर्शविला व अनोखी श्रद्धांजली वाहिली. मात्र, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिका जात असल्याचे बघून अनेकांच्या काळजाचा
ठोका चुकला.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. संक्रमित रुग्ण आणि मृत्यूसंख्येचा आलेख वाढतच आहे. अशातच कोरोना रुग्णांची ने-आण करताना रुग्णवाहिकाचालक संजय पुनसे यांना अगोदर सारीने ग्रासले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ मे रोजी त्यांना भरती करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची लागण झाली. मात्र, १९ मे रोजी रात्री १ वाजता ते दगावले. त्यांचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. आपला सहकारी गेल्याचे अतिव दुख: अन्य खासगी रुग्णवाहिका चालकांना झाले. रुग्णवाहिका चालक संघटनेच्यावतीने पुनसे यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सायरनचा जोरदार आवाज करीत रुग्णवाहिका रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भुतेश्वर चौक येथून हिंदू स्मशानभूमीकडे निघाल्या. एकाचवेळी सुमारे १७ ते २० रूग्णवाहिका हिंदू स्मशानच्या दिशेने जात असल्याचे बघून बुधवारी कोरोना मृत्यूचा स्फोट तर झाला नाही, अशी भीती नागरिकांना झाली होती. मात्र, रूग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या सहकारी चालकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी सायरन वाजवीत रिकाम्या रुग्णवाहिका आणल्यात, अशी माहिती मिळताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, एकाचवेळी १७ ते २० मृतदेह रुग्णवाहिकांमध्ये नेण्यात येत नाही, हे चित्र बघून काही क्षण शहरातील नागरिकांसह भुतेश्वर चौक परिसरातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली होती, हे विशेष.
कोट
संजय पुनसे यांना सारी आजाराने ग्रासल्याने इर्विनध्ये ९ मे रोजी भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र. १९ मेच्या रात्री १ वाजता दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आला.
- निरंजन खंडारे, सहसचिव रुग्णवाहिका संघटना
कोट
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. मात्र, रुग्णवाहिका चालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सायरन वाजवीत हिंदू स्मशानभूमीपर्यंत नेल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्याअनुषंगाने रुग्णवाहिका चालकांचे नाव निष्पन्न करून गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- राहुल आठवले, पोलीस निरीक्षक, सिटी कोतवाली ठाणे
---------------------------