ॲम्ब्युलन्स निघाल्या बार, ढाब्यावर; परवानगी कुणाची??

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 03:15 PM2022-11-30T15:15:26+5:302022-11-30T15:18:14+5:30

आरोग्याची काळजी कुणाला; मेळघाटच्या टेब्रूसोंडा, काटकुंभ, मोर्शीच्या रुग्णवाहिकांचा वाट्टेल तिथे थांबा, चालकांची मनमर्जी

Ambulance seen on bar, dhaba in amravati; incident revealed during sting operation | ॲम्ब्युलन्स निघाल्या बार, ढाब्यावर; परवानगी कुणाची??

ॲम्ब्युलन्स निघाल्या बार, ढाब्यावर; परवानगी कुणाची??

googlenewsNext

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : रुग्णांच्या सेवेसाठी शासनामार्फत आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका दिली जाते, परंतु मेळघाटसह जिल्ह्यातील ॲम्ब्युलन्स वैयक्तिक खरेदी बियर बार, ढाब्यासमोर दिसू लागल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची काळजी कोणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे.

वाढती लोकसंख्या त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येचा भार वाढत आहे. अनेक ठिकाणी वाढीव खाटा मंजूर करण्यात आल्या आहेत. शासनाच्या आरोग्य विभागामार्फत रुग्णाला तात्काळ सेवा मिळावी, यासाठीच आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका सोबतच अपघातस्थळी तात्काळ पोहोचण्यासाठी १०८ आणि १०२ क्रमांकाच्या अतिरिक्त रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.

रुग्णांना घेऊन पुढील जिल्हा किंवा तालुकास्तरावर निघणाऱ्या या रुग्णवाहिका काम झाल्यावर किंवा रुग्णांना एका ठिकाणी ठेवून त्यातीलच चालक, डॉक्टर कोणाच्या परवानगीने खरेदी आणि ढाब्यावर लावत आहे. याचा स्टिंग ऑपरेशनने लोकमतने उलगडा केला आहे. काटकुंभ आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका अमरावती येथील होप रुग्णालयात भरती असलेल्या चिमुकल्यास परत नेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बोलावली होती. परंतु माता व बालकाला वाहनात बसून चालक आणि संबंधित बेपत्ता होते.

मोर्शी उपजिल्ह्याची रुग्णवाहिका जयस्तंभवर

मेळघाटातील रुग्णवाहिका नेहमीच वादग्रस्त ठरत असताना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयाची एमएच २७ ए ए ५११७ क्रमांकाची रुग्णवाहिका २९ डिसेंबर रोजी दुपारी २:१५ वाजतापासून अमरावती शहरातील जयस्तंभ चौकावर उभी होती. या वाहनातसुद्धा चालक व इतर कोणीही उपस्थित नव्हते. शासकीय रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनीही रस्त्यावर असलेल्या या रुग्णवाहिकेवर कुठलीच कारवाई केली नाही.

टेब्रुसोंडा येथील रुग्णवाहिका बार, ढाब्यावर

प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या या रुग्णवाहिका अखत्यारीत येणाऱ्या गावांमध्ये जाऊन रुग्णांना घेऊन थेट रुग्णालयात किंवा सांगितलेल्या ठिकाणी जाणे योग्य आहे. परंतु १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजचेच्या दरम्यान टेब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेली रुग्णवाहिका परतवाडा, धारणी मार्गावरील एका बियर बार, वजा ढाब्यावर मोठ्या ऐटीत एक तासापेक्षा अधिक वेळापर्यंत उभी होती.

काटकुंभची रुग्णवाहिका नेहरू मैदानात

२९ डिसेंबर रोजी एम एच २७ बी एक्स ५८८२ क्रमांकाची रुग्णवाहिका दुपारी २ वाजतापासून अमरावती शहरातील नेहरू मैदान येथे उभी होती. तेथील चालक बेपत्ता होता, तर लहानश्या चिमुकलेला घेऊन एक आदिवासी महिला त्यांची वाट पाहात बसली होती. या महिलेला विचारले असता ती बोलण्यास समर्थ ठरली. चालक व इतर कोणीही प्रतिनिधी डॉक्टर तेथे उपस्थित नव्हते.

काटकुंभ येथील रुग्णवाहिका आपण अमरावती येथे भरती बालकास नेण्यासाठी बोलावली होती, तर टेब्रुसोंडा येथील धाब्यावर गेलेल्या रुग्णवाहिकासंदर्भात माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल.

- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

Web Title: Ambulance seen on bar, dhaba in amravati; incident revealed during sting operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.