शहरात दररोज सहा रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्सची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:15+5:302021-05-03T04:08:15+5:30

अमरावती : शहरात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी बेड मिळविणे अत्यंत अवघड झाले आहे. कारण आयसीयू, व्हेटिंलेटर रिकाम नसल्याने रुग्णालयांना नकार ...

Ambulances roam the city daily with six patients | शहरात दररोज सहा रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्सची भटकंती

शहरात दररोज सहा रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्सची भटकंती

Next

अमरावती : शहरात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी बेड मिळविणे अत्यंत अवघड झाले आहे. कारण आयसीयू, व्हेटिंलेटर रिकाम नसल्याने रुग्णालयांना नकार देण्याची वेळ आली आहे. शहरात तीन रुग्णवाहिकांना सहा रुग्णांना घेऊन फिरावे लागत आहे. ही फक्त तीन रुग्णवाहिकांची स्थिती आहे. जिल्ह्यात ३३५ रुग्णवाहिका आहे. मग, त्यातून किती रूग्णांना बेड मिळविण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात भटकावे लागत असेल, याचा केवळ विचारच केलेला बरा. फक्त गंभीर रुग्णांच्या उपचाराची सुविधा वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहरातील सुपर स्पेशालिटी, जिल्हा सामान्य रूग्णालय, पीडीएमसी या रूग्णालयातील रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका चालकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. शहरात ग्रामीण भागांतून आणि अन्य जिल्ह्यातून रुग्णांना घेऊन आल्यानंतर कोणकोणत्या बाबींना समोर जावे लागले, याचा उलगडा रुग्णवाहिका चालकांनी केला. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दाखल करताना नातेवाईक संबंधित रुग्णालयांशी आधीच बोलून घेतात आणि नंतर रूग्ण नेण्यास प्राधान्य देतात; पंरतु तरीही रुग्ण नेल्यानंतर रुग्णालयांसमाेर रुग्णवाहिकेतच रुग्णांना ठेवून दाखल होण्याची वाट पाहत बसावी लागते. आणलेला रूग्ण ऑक्सिजन बेड नाही. व्हेटिंलेटर नाही म्हणून रुग्णालये नाकारतात. त्यामुळे ऐनवेळी अन्य रुग्णालयाची शोधाशोध करावी लागते अथवा सरळ सुपर स्पेशालिटीत न्यावे लागते, असे रुग्णवाहिका चालकांनी सांगितले. अमरावती येथे रविवारी केवळ पाच व्हेंटिलेटर उपलब्ध होते. त्यामुळे गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर लागले तर भटकंती करण्याचीच वेळ ओढवत असल्याची स्थिती आहे.

---------------------

रुग्णवाहिकांना सायरन

शहराच्या अनेक रस्त्यावर सध्या कोरोनाच्या रुग्णांना घेऊन धावणाऱ्या रुग्णवाहिका दिसत आहेत. या रुग्णवाहिकांच्या सायरनमुळे एक प्रकारचे भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे चित्रही अनुभवता येते.

----------

दिवसभरात किती फिरावे लागते....

दिवसभात ७ फेऱ्या

दिवसभरात ७ फेऱ्या रुग्णवाहिका चालक बाशीन शेख म्हणाले, ग्रामीण भागातून इर्विन रुग्णालय, सुपर स्पेशालिटीत कोरोना रुग्णांना घेऊन येताे. दिवसभरात ७ फेऱ्या होतात. कधी तर नागपूर येथे रुग्णांना घेऊन जावे लागत आहे. कधी पीडीएमसी रुग्णालयाततर कधी खासगी रुग्णालयात रुग्ण पोहोचवतो. खासगी रुग्णालयासमोर अनेक तास उभे राहावे लागते. बेड नाही मिळाला तर इतर रुग्णालयाकडेही जावे लागतात. ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, अशी कारणे सांगितली जातात.

---------------

दिवसभरात ५ फेऱ्या

रुग्णवाहिका चालक सुयोग खंडारे म्हणाले, एका रुग्णालयात दाखल रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाेहोचविण्याचे काम प्राधान्याने करतो. अशा दिवसभरात किमान ५ फेऱ्या होतात. रुग्णाला अन्य रुग्णालयात का हलविले जाते, हे नातेवाईक सांगत नाही. त्यांना जेवढी मदत करता येईल, तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे काम करताना आता फार भीतीही वाटत नाही.

---------

दिवसभरात ४ फेऱ्या

रूग्णवाहिका चालक सतीश गोंडाणे म्हणाले, अचलपूर, परतवाड्यातून सध्या अमरावतीत रुग्णांना घेऊन येतो. दिवसभरात ४ फेऱ्या होतात. रुग्ण हलविण्यापूर्वी नातेवाईकांचे रुग्णालयांशी बाेलणे झालेले असते. तरीही कधीकधी रुग्णाला घेऊन गेल्यानंतर रुग्णाला दाखल करून घेण्यास अडचणी येतात. ऑक्सिजन बेड नाही. व्हेंटिलेटर रिकामे झाले आहे, अशी कारणे सांगितली जातात. त्यामुळे ऐनवेळी रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जावे लागत आहेत.

Web Title: Ambulances roam the city daily with six patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.