अमेरिकन प्रतिनिधी गाडगेबाबांच्या कार्याने भारावले, अमरावती विद्यापीठाला दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 08:12 PM2018-01-23T20:12:00+5:302018-01-23T20:12:33+5:30
अमेरिकन प्रतिनिधी भारत दौ-यावर आले असता त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मंगळवारी भेट दिली. गाडगेबाबांच्या कार्याने ते भारावून गेलेत. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन अमेरिकन व भारतीय शिक्षण पद्धतीवरदेखील त्यांनी चर्चा केली.
अमरावती : अमेरिकन प्रतिनिधी भारत दौ-यावर आले असता त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मंगळवारी भेट दिली. गाडगेबाबांच्या कार्याने ते भारावून गेलेत. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन अमेरिकन व भारतीय शिक्षण पद्धतीवरदेखील त्यांनी चर्चा केली.
विद्यापीठाने संशोधनावर अधिक भर देऊन शिक्षण पद्धती ही पदवीपेक्षा व्यवसायाभिमुख असावी, विद्यार्थ्यांमधील संस्कारमूल्य वृद्धींगत होण्यासाठी भर द्यावा, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून अमेरिका आणि भारत देशात विद्यार्थी व युवकांचे सांस्कृतिक व क्रीडाविषयक आदान-प्रदान व्हावे आदी विषयांवर चर्चा झाली. अमेरिकन प्रतिनिधींनी आम्हाला भारत देश खूप आवडला. येथील लोकांच्या जीवनपद्धती, राहणीमान अतिशय चांगली आहे. अमरावती विद्यापीठाचा परिसर निसर्गरम्य असून वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीमधून विश्व कल्याणाचा संदेश देण्यात आल्याबाबत त्यांनी मनस्वी समाधान व्यक्त केले. संत गाडगेबाबांच्या जीवनावरील गॅलरी बघून आम्ही भारावल्याचे अमेरिकन प्रतिनिधींनी व्यक्त केले.
प्रतिनिधींमध्ये ब्रॉड पालमर, जेस अॅडम्स, नतालिना पेजर, ग्रॅसी पालमर, मॅथ्यू मार्टिन, ब्रिटनी गार्नर, हॉर्मोनी गार्नर, डेव्हिड पट, कटेलीन पट, टेलर पट, तुलीया हस, जेसिका हॅरिसन, कर्ट कॅम्बेल, मैकी कॅम्बेल यांचा समावेश होता. अमेरिकन प्रतिनिधींनी विद्यापीठातील संत गाडगेबाबा अध्यासन व स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राला भेट देऊन छायाचित्र गॅलरीची पाहणी केली.
याप्रसंगी कुलसचिव अजय देशमुख, एम.बी.ए. विभागप्रमुख संतोष सदार, श्री संत गाडगे बाबा अध्यासनाचे समन्वयक दिलीप काळे, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक एस.के. ओमनवार, प्राचार्य डी.जी. वाकडे, अमरसिंग राठोड, प्रणव नितनवरे आदी उपस्थित होते.