तापमानामुळे आंबिया बहाराला गळती !
By admin | Published: April 12, 2017 12:42 AM2017-04-12T00:42:11+5:302017-04-12T00:42:11+5:30
वाढते तापमान व खालावलेली भूजल पातळी यामुळे आंबिया बहराला गळती लागली आहे.
संत्राबागांची अवस्था बिकट : २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे घ्यावे लागते पाणी
वरूड : वाढते तापमान व खालावलेली भूजल पातळी यामुळे आंबिया बहराला गळती लागली आहे. परिणामी तालुक्यातील संत्रा बागाईतदारांची अवस्था बिकट झाली आहे.
वरूड तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रात संत्राझाडे आहेत. मागील वर्षी मृग बहर उत्तम होता. मात्र, उत्पादन जास्त झाल्याने संत्र्याला बाजारपेठांत योग्य भाव मिळत नव्हता. अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांना संत्रा रस्त्याच्या कडेला फेकण्याची वेळ आली होती. जिल्ह्यातील सर्वच मोठ्या बाजारपेठांत संत्र्यांचे ढिगारेलागले होते. यामुळे आंबिया बहर चांगला आल्यास झालेले नुकसान भरून काढता येईल, अशी आशा संत्रा बागायतदारांना होती.
दरम्यान, संत्रा आंबिया बहाराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाई निर्माण झाली. वरूड तालुक्यातील विहिरी आटू लागल्या आहेत. भूजल पातळी खालवल्याने बोअर बंद पडले. सिंचन प्रकल्पामध्ये केवळ १० ते १५ टक्केच जलसाठा आहे. यामुळे पाणी वापर संस्थाना पाणी देणे बंद झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अतितापमानामुळे व खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्राबागा वाचविणे कठीण झाले आहे. संत्रा बागायतदार २०० ते ४०० रुपये प्रती तास याप्रमाणे पाणी उपसा करीत आहेत. पाणी मिळेल त्यावेळी बागांना सिंचन केले जात आहे. तालुक्यात वाढलेल्या जलसंकटाचा सर्वाधिक फ टका संत्रा बागाईतदारांना बसला आहे. तालुक्यात भूजल पातळी वाढावी यासाठी कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग, लघु मध्यम सिंचन प्रकल्प तयार केले आहेत. मात्र मार्च महिन्यानंतर भूजल पातळी खालावली. यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माणन झाला. (तालुका प्रतिनीधी)