आंबियाला विम्याचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:54 PM2017-10-06T23:54:18+5:302017-10-06T23:54:31+5:30
पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदाच्या हंगामात संत्रा, मोसंबी, डाळींब, केळी, आंबा व लिंबू आदी पिकांच्या आंबिया बहरासाठी लागू करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदाच्या हंगामात संत्रा, मोसंबी, डाळींब, केळी, आंबा व लिंबू आदी पिकांच्या आंबिया बहरासाठी लागू करण्यात आली. फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. कर्जदार शेतकºयांसाठी ही योजना सक्तीची तर गैरकर्जदार शेतकºयांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे. संत्राच्या आंबिया बहरासाठी जिल्ह्यातील ७९ महसूल मंडळात ही योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेसंदर्भात कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावाला राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने २२ सप्टेंबरला मान्यता दिल्यानंतर कृषी विभागाने गुरुवारी ही योजना निवडक जिल्ह्यामध्ये लागू केली. ‘महावेध’द्वारा स्थापन केलेल्या हवामान केंद्राची व जेथे ही सुविधा उपलब्ध नाही तेथे त्रयस्त संस्थेद्वारा स्थापन केलेल्या हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेली आकडेवारी तसेच योजनेत नमूद फळपीकनिहाय प्रमाणके यांची सांगड घालून शेतकºयांना सबंंधित विमा कंपनी शेतकºयांना नुकसान भरपाई देणार आहे. याचे दायित्व शासनावर राहणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
कमी किंवा जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकºयांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. संत्रा पिकासाठी अवेळी पाऊस एक डिसेंबर २०१७ ते १५ जानेवारी २०१८, कमी तापमान १६ जानेवारी ते २८ जानेवारी, जास्त तापमान एक मार्च ते ३१ मे, तसेच गारपीटसाठी एक जानेवारी ३० एप्रिल २०१८ असा विमा संरक्षित कालावधी आहे. विमा कंपनीकडून पीकनिहाय प्रती हेक्टरी प्राप्त वास्तवदर्शी विमा हप्ता दर व शेतकºयांनी प्रत्यक्ष भरावयाचा विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता समजण्यात येईल.व हे अनुदान केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात दिल्या जाणार आहे.
संत्रासाठी या महसूल मंडळांचा समावेश
अमरावती तालुक्यात अमरावती, वडाळी, नवसारी, बडनेरा, डवरगाव, मांहुली जहांगीर, नांदगाव पेठ. भातकुली तालुक्यात निंभा. चांदूर रेल्वे तालुक्यात चांदूर रेल्वे, पळसखेड, घुईखेड, आमला विश्वेश्वर, घुईखेड, सातेफळ. धामणगाव तालुक्यात चिंचोली, भातकुली, अंजनसिंगी, मंगरूळ दस्तगीर, दढापूर, तळेगाव दशासर. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नांदगाव खंडेश्वर,दाभा, शिवणी, मंगरूळ चव्हाळा, पापळ, लोणी, धानोरा गुरव, माहुलीचोर. मोर्शी तालुक्यात अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर, धामणगाव, नेरपिंगळाई, शिरखेड, मोर्शी वरूड तालुक्यात वरूड, बेनोडा, पुसला, वाढोडा, वणी, शेंदूरजनाघाट, राजुरा बाजार. तिवसा तालुक्यात तिवसा, मोझरी, वºहा, कुºहा, वरखेड. चांदुरबाजार तालुक्यात चांदुरबाजार, ब्रम्हणवाडा थडी, बेलोरा, शिरजगाव, करजगाव, तळेगाव मोहना. अचलपूर तालुक्यात अचलपूर, रासेगाव, असतपूर, परसापूर, पथ्रोट, परतवाडा. चिखलदरा तालुक्यात चिखलदरा, सेमाडोह, टेंबूरखेडा व अंजनगाव सुर्जी तालुक्यात अंजनगाव, भंडारज, विहिगाव, सातेगाव, कापूसतळणी व कोकर्डा या मंडळांचा समावेश आहे.