अमोल मिटकरी किर्तनकार, त्यांनी..; रवि राणांनी लगावला टोला, दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:42 AM2023-02-28T10:42:13+5:302023-02-28T11:08:34+5:30

नाफेड चना खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे.

Amol Mitkari Kirtankar, He..; MLA Ravi Rana gave advice while laying the tola | अमोल मिटकरी किर्तनकार, त्यांनी..; रवि राणांनी लगावला टोला, दिला सल्ला

अमोल मिटकरी किर्तनकार, त्यांनी..; रवि राणांनी लगावला टोला, दिला सल्ला

googlenewsNext

अमरावती - राष्ट्रवादीचे आमदारअमोल मिटकरी सातत्याने राज्य सरकार आणि भाजप व शिंदे गटावर टीका करत असतात. कधी पत्रकारांना दिलेल्या उत्तरातून तर कधी सोशल मीडियातून ते सध्याच्या सरकारला लक्ष्य करतात. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सरकारच्या कामाचं ते आवर्जून कौतुक करत होते. दरम्यान, त्यावेळी हनुमान चालिसावरुन त्यांनी राणा दाम्पत्यांवरही टीका केली होती. आता, पुन्हा एकदा चना खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेवरुन मिटकरींनी आमदार रवि राणांवर टीका केली, त्यास, राणा यांनीही प्रत्युत्तर दिलंय. तसेच, अमोल मिटकरी हे किर्तनकार आहेत, असा टोलाही लगावला.  

नाफेडच्या चना खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याने नोंदणी प्रक्रिया रद्द करावी लागली. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. या टीकेला आमदार राणा यांनी प्रत्त्युतर दिलंय. मिटकरी कीर्तनकार आहेत. त्यांनीं स्वतः ची प्रसिध्दी करण्यासाठी वायफळ बोलणं टाळावं, असा सल्लाच आमदार रवी राणा यांनी अमोल मिटकरींना दिला आहे.

३३ महिने शेतकऱ्यांचे हाल झाले

ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पणन संचालकांना त्वरित ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. आधीच सरकार हे झोपलेलं सरकार होत. मात्र, शिंदे फडणवीस सरकार तात्काळ दखल घेतात. मविआ सरकारमध्ये ३३ महिन्यात शेतकऱ्यांचे हाल झाले. तर, राज्याचे मुख्यमंत्री ६ महिने घराबाहेरच पडले नाहीत, असेही आमदार राणा यांनी म्हटले.  

Web Title: Amol Mitkari Kirtankar, He..; MLA Ravi Rana gave advice while laying the tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.