आठ फ्लॅट फोडणाऱ्या चोरांकडून ५ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 10:09 PM2019-05-11T22:09:55+5:302019-05-11T22:10:43+5:30
गुन्ह्याची कबुली : १८५ ग्रॅमचे सोने जप्त
अमरावती : आंतरराज्यीय टोळीने अमरावती शहरातील आठ फ्लॅट फोडल्याची कबुली पोलिसांनी दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचे १८५ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले. या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोकणातील रत्नागिरीतून अटक आहे.
शहरात दुपारच्या वेळेत बंद फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास करणाºया टोळीचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राम गिते, पोलीस हवालदार अजय मिश्रा, नीलेश पाटील, मोहम्मद सुलतान, दिनेश नांदे यांचे एक पथक तयार करून, त्या पथकाला कोकणातील रत्नागिरीत पाठविण्यात आले होते.
पोलिसांनी तेथून आंतरराज्यीय चोरांच्या टोळीतील कैलास चिंतामण मोरे (३९), जयप्रकाश राजाराम यादव, शरद नामदेव मोरे (२४) व अजय प्रताप कटवाल (२४, सर्व रा.धुळे) यांना अटक केली. पोलीस चौकशीत आरोपींनी अमरावती शहरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना नांदगाव पेठ येथील गुन्ह्यात अटक केली, त्यांची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशी केली. आता दुसºया गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या धुळे येथील ठिकाणांरून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.
महाराष्ट्रसह गुजरातमध्येही केल्या चोऱ्या
आंतरराज्यीय चोरांच्या या टोळीने रत्नागिरी, सांगली, सातारा, धुळे, वर्धा, मुंबईसह गुजरात राज्यातही घरफोड्या केल्या आहेत. पोलीस चौकशीत ही बाब पुढे आली.
या व्यक्तींची घरे फोडली
या टोळीने गाडगेनगर हद्दीतील बाळकृष्ण श्रावण दंदे (५५,रा.मोहननगर), पवन रामराव टेकाडे (४२,रा.श्रमसाफल्यकॉलनी), पंकज श्रीधरराव हरणे (४०,रा.कठोरानाका), सविता राजेंद्र ढोले (४८,रा.रेखाकॉलनी), मिलींद सुधाकर गावंडे (४०,रा. स्वावलंबीनगर), नांदगाव पेठ हद्दीतील शंकर रामकृष्ण निवल (३८,रा.नित्रागण कॉलनी), पवन किशोर शिवनकर (३२,रा.रहाटगाव रोड) व फ्रेजरपुरा हद्दीतील अंकुश श्रीपद जगताप (६१,रा.डेंटल कॉलेजसमोर) यांची घरे फोडल्याची कबुली दिली आहे.