आमपाटी प्रकल्पाचे दार उघडले; अधिकारी पोहोचले घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 04:09 PM2022-12-30T16:09:37+5:302022-12-30T17:58:02+5:30

आदिवासींनी घाबरू नये, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

Ampati project doors open, officers visited on the spot | आमपाटी प्रकल्पाचे दार उघडले; अधिकारी पोहोचले घटनास्थळी

आमपाटी प्रकल्पाचे दार उघडले; अधिकारी पोहोचले घटनास्थळी

Next

चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील गांगरखेडा येथे ४० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला आमपाटी प्रकल्प फुटण्याच्या भीतीने परिसरात दहशत पसरली होती. लोकमतमध्ये गुरुवारी वृत्त प्रकाशित होताच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्प स्थळी भेट देऊन आदिवासींना हा प्रकार समजावून सांगितला व घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले.

गांगरखेडा येथे आमपाटी प्रकल्प मागील दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला आहे. जलसंधारण विभागाच्या या कामावर गुणवत्तेचा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला होता. १५ दिवसांपासून मुख्य विमोचकामधून गढूळ पाणी जात असल्याने प्रकल्प फुटण्याची भीती त्यांच्यात पसरली होती. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच सहायक अभियंता एन.एस. मावळे व कनिष्ठ अभियंता अंकुश मानकर यांनी तेथे जाऊन आदिवासींसोबत चर्चा केली आणि संपूर्ण परिस्थिती सांगितली.

घाबरू नका, विमोचकातून पाणी सोडले

गुरुवारी धरणाच्या ठिकाणी मुख्य विमोचकाची व १२० मीटर लांब नलिकेच्या आत शिरून पाहणी करण्यात आली. त्यामध्ये अडकलेला गाळ साफ करण्यासाठी मुख्य विमाेचकाचे दार उचलण्यात आले. पाण्याच्या प्रवाहाने तो गाळ निघून गेला. आदिवासींच्या उपस्थितीत सर्व कार्य करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी कळविले आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे.

तहसीलदारांनी मागितला लेखी अहवाल

संपूर्ण प्रकरणाचा लेखी अहवाल चिखलदराच्या तहसीलदार माया माने यांनी संबंधित विभागाला मागितला. दुसरीकडे नागरिकांनी कुठल्याच प्रकारे घाबरू नये व प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.

प्रकल्पाच्या गुणवत्तेची अजूनही चर्चा?

गढूळ पाणी निघताच संपूर्ण प्रकल्पाच्या कार्यावरच आदिवासींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे प्रकल्पात नेमका घोटाळा काय झाला किंवा कसे, यावरही आता वेगळी चर्चा रंगू लागली आहे.

Web Title: Ampati project doors open, officers visited on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.