अमरावती २२, वर्धा ३९ तर यवतमाळ जिल्ह्यात २५.११ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:30+5:302021-07-14T04:16:30+5:30

अमरावती जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार १६८ पुरुष व ३ लाख २९ हजार ७७० महिलांचे लसीकरण झाले आहे. वर्धा ...

Amravati 22, Wardha 39 and Yavatmal district 25.11 per cent vaccination | अमरावती २२, वर्धा ३९ तर यवतमाळ जिल्ह्यात २५.११ टक्के लसीकरण

अमरावती २२, वर्धा ३९ तर यवतमाळ जिल्ह्यात २५.११ टक्के लसीकरण

Next

अमरावती जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार १६८ पुरुष व ३ लाख २९ हजार ७७० महिलांचे लसीकरण झाले आहे.

वर्धा जिल्ह्यात २ लाख १३ हजार ४९१ पुरुष व २ लाख ८०४ महिलांचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने लस पुरवठा होत असून आतापर्यंत ३ लाख ३१ हजार २२६ व्यक्तींना लसीचा पहिला व ८३ हजार ९४ व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एकूणच जिल्ह्यात आतापर्यंत ३९.१५ टक्के लसीकरण झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात २५.११ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यात ३ लाख ६१ हजार ८८७ पुरुषांनी व ३ लाख १ हजार ९६६ महिलांनी लस घेतली. १८ ते ४४ या वयोगटात २ लाख ७ हजार ९४० जणांचे लसीकरण झाले आहे. ४५ ते ६० या वयोगटातील २ लाख ६२ हजार ६८ जणांनी लस घेतली आहे, तर ६० वर्षांवरील १ लाख ९४ हजार ८ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आजवर कोविशिल्डचे ५ लाख ४९ हजार ४७५ डोस देण्यात आले, तर कोव्हॅक्सिनचे १ लाख १४ हजार ५४१ डोस लाभार्थी नागरिकांनी घेतले आहेत.

Web Title: Amravati 22, Wardha 39 and Yavatmal district 25.11 per cent vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.