Amravati: बडनेरा ते वर्धा सेक्शनवर आता ३० ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावणार

By गणेश वासनिक | Published: November 22, 2023 06:10 PM2023-11-22T18:10:30+5:302023-11-22T18:10:57+5:30

Amravati News: बडनेरा ते वर्धा यादरम्यान सेक्शनवर आता ३० रेल्वे गाड्या प्रतितासी १३० किमी. वेगाने धावत आहे. गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी अनेक विभागांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत.

Amravati: 30 trains will now run at a speed of 130 km per hour on the Badnera to Wardha section | Amravati: बडनेरा ते वर्धा सेक्शनवर आता ३० ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावणार

Amravati: बडनेरा ते वर्धा सेक्शनवर आता ३० ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावणार

- गणेश वासनिक 
अमरावती - बडनेरा ते वर्धा यादरम्यान सेक्शनवर आता ३० रेल्वे गाड्या प्रतितासी १३० किमी. वेगाने धावत आहे. गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी अनेक विभागांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. यामध्ये मल्टी-ट्रॅकिंग (एका विभागात अनेक ट्रॅक टाकणे), ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामे यांचा समावेश आहे. या कामांमुळे मध्य रेल्वेला या बडनेरा ते वर्धा विभागांवर ताशी १३० किमी वेगाने बुधवारपासून गाड्या चालवता आल्या आहेत.

मध्य रेल्वे सध्या एकूण १२०६.७३ किमी म्हणजे ९५.४४ किमी, इगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा सेक्शनवर ५२६.६५ किमी, पुणे ७५९ किमी असे एकूण १२०६.७३ किमी अंतर कापून १३० किमी प्रतितास वेगाने गाडया चालवत आहे.
सुरक्षेच्या सर्व बाबी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणी केल्यानंतर या गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. यामुळे गाड्यांची धावण्याची वेळ कमी होईल आणि ट्रेनच्या हालचालींची एकूण वक्तशीरता सुधारणार आहे.

 बुधवारपासून या गाड्यांचा प्रतितास १३० किमी वेग
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया सुपर फास्ट द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम सुपर फास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी सुपर फास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्स्प्रेस दैनिक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा साप्ताहिक सुपर फास्ट एक्सप्रेस
- पुणे-संत्रागाची-पुणे साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या कर्मभूमी साप्ताहिक एक्स्प्रेस
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हावडा दुरांतो आठवड्यातून चार दिवस
-गोंदिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेस डेली
- नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस डेली
- लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी टर्मिनस साप्ताहिक एक्स्प्रेस
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा टर्मिनस सुपर फास्ट दैनंदिन
- लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार समरसता द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस

Web Title: Amravati: 30 trains will now run at a speed of 130 km per hour on the Badnera to Wardha section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.