Amravati | अडीच महिन्यांत लम्पीने दगावली ७५२ जनावरे, १६,२१४ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 02:45 PM2022-10-19T14:45:35+5:302022-10-19T14:55:19+5:30

पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण

Amravati | 752 animals killed due to Lumpy Virus in two and a half months, 16,214 infected | Amravati | अडीच महिन्यांत लम्पीने दगावली ७५२ जनावरे, १६,२१४ बाधित

Amravati | अडीच महिन्यांत लम्पीने दगावली ७५२ जनावरे, १६,२१४ बाधित

googlenewsNext

अमरावती : सद्यस्थितीत पशुधनावर लम्पी चर्मरोग आजार राज्यात सर्वत्र आढळून येत आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील अनेक गावात लम्पी स्क्रिन आजार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. गत ऑगस्ट ते १७ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाभरात १६ हजार २१४ पशुधन बाधित झाले आहे. तर ७५२ पशुधन आतापर्यंत दगावले आहे. पाळीव प्राण्यांचा होत असलेल्या मृत्यूमुळे पशुधन पालकांमध्ये चिंता पसरली आहे.

लम्पी आजाराने आतापर्यंत दगावलेल्या ७५२ पैकी १७५ पशुधनाचा मृत्यू झालेला आहे. यात १७५ पशुधन पालकांना सुमारे ४५ लाख ५५ हजार रुपयाचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे. आजघडीला जिल्हाभरात १६ हजार २१४ पैकी ११,०६७ एवढे पशुधन लम्पी आजारांतून बरे झाले आहे. तर चार हजार ३९५ इतके बाधित पशुधन हे विलगीकरणात असून त्याच्यावर पशुसंवर्धन विभागाकडून उपचार सुरू आहेत. जिल्हाभरात गायवर्गीय चार लाख ६४ हजार ८७३ एवढे पशुधन आहे. यापैकी चार लाख चार हजार २२८ पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके यांनी दिली.

एकूण गोवंशीय प्राण्यांची संख्या- ४,६४,८७३

मृत्यू पडलेले प्राणी - ७५१

अनुदान साहाय्यता निधी मंजूर झालेली प्रकरणे - १७५

एकूण बाधित प्राणी - १६,२१४

रोगमुक्त झालेले - ११,०६७

औषधोपचार सुरू असलेले - ४,३९५

एकूण लसीकरण - ४,०४,२२८

मृत्यू पावलेल्या जनावरांचे अर्थसाहाय्य - १७५

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात केले आहे. लसीकरणानंतरही बाधित जनावरांची संख्या नियंत्रणात लम्पीचा संसर्ग वाढू नये, याकरिता पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.

- डॉ. संजय कावरे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग

Web Title: Amravati | 752 animals killed due to Lumpy Virus in two and a half months, 16,214 infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.