अमरावती विमानतळाला IATA कोड! आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेकडून शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:04 IST2025-03-28T13:03:47+5:302025-03-28T13:04:16+5:30

यापुढे संगणकावर अमरावती विमानतळाचा आयएटीए कोड ‘एव्हीटी’ म्हणून उमटणार आहे

Amravati Airport gets IATA code! Approval from International Air Transport Association | अमरावती विमानतळाला IATA कोड! आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेकडून शिक्कामोर्तब

अमरावती विमानतळाला IATA कोड! आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेकडून शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : बडनेरानजीक बेलोरा येथील अमरावतीविमानतळाला आयएटीए कोड मिळाला आहे. आयएटीए प्रमाण प्रवासी संस्थांना विमान कंपन्यांच्या वतीने विमान तिकिटे जारी करण्याची परवानगी देते आणि आरक्षण प्रक्रिया सुलभ करते. यापुढे संगणकावर अमरावती विमानतळाचा आयएटीए कोड ‘एव्हीटी’ म्हणून उमटणार आहे.

जगातील सुरक्षित, विश्वासार्ह, सुरक्षित आणि किफायतशीर हवाई सेवांना प्रोत्साहन देणे, विमान उद्योगाचे प्रतिनिधित्व करणे, नेतृत्व करणे आणि सेवा देणे हे आयएटीएचे ध्येय आहे. ही कार्गो आणि प्रवासी विमान वाहतुकीच्या भाड्यांचे निरीक्षण आणि नियुक्ती करण्यासाठी स्थापन केलेली संघटना अर्थात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना आहे. 

राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ

एकदा कार्यान्वित झाल्यावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हा राज्यातील तिसरा व्यावसायिक विमानतळ असेल. विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे. सध्या नाईट लँडिंग सुविधा उभारण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. येत्या काही दिवसांत अमरावती विमानतळाहून अलायन्स एअर लाईन्सची एटीआर ७२ मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे.

अमरावती यापुढे ‘एव्हीटी’ म्हणून उमटणार

विमानतळाला नियुक्त केलेल्या आयएटीए कोडमध्ये तीन अक्षरे असतात आणि ती विमानतळ आणि शहराच्या नावांमधून तयार केली जातात. कोड बहुतेक शहराच्या नावातून निवडलेल्या अक्षरांनी तयार केले जातात. विमानतळांचे दोन अक्षरी कोड पहिल्यांदा १९३० मध्ये दिले गेले. त्यानंतर तीन-अक्षरी कोड वापरण्यास सुरुवात झाली. कोणताही संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी जुन्या कोडच्या शेवटी एक्स जोडण्यात आला.

Web Title: Amravati Airport gets IATA code! Approval from International Air Transport Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.