Amravati: अमरावतीचे ईर्विन’ होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय; रुग्णसेवा बळकटी, विस्तारीकरणाचे व्हिजन

By गणेश वासनिक | Published: October 14, 2023 06:37 PM2023-10-14T18:37:39+5:302023-10-14T18:38:13+5:30

Amravati : अमरावती जिल्ह्याची आरोग्य संजीवनी संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) आता ८०० खाटांचे होणार आहे.

Amravati: Amravati's Irwin' will be a new 800-bed hospital; Vision of strengthening, expanding patient care | Amravati: अमरावतीचे ईर्विन’ होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय; रुग्णसेवा बळकटी, विस्तारीकरणाचे व्हिजन

Amravati: अमरावतीचे ईर्विन’ होणार ८०० खाटांचे नवे रूग्णालय; रुग्णसेवा बळकटी, विस्तारीकरणाचे व्हिजन

- गणेश वासनिक 
अमरावती - जिल्ह्याची आरोग्य संजीवनी संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) आता ८०० खाटांचे होणार आहे. त्याकारिता आमदार सुलभा खोडके यांच्यासह आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून नवीन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहर तसेच धारणी, मेळघाट तसेच मध्यप्रदेशाच्या सीमाभागातून रुग्ण उपचारासाठी ईर्विनमध्ये दाखल होतात. तसेच सद्या रुग्णालयात ३९० बेड्स उपलब्ध असल्याने एका बेडवर दोन पेशंट अशी स्थिती आहे. त्यामुळे इर्विनमध्ये वाढीव ४०० खाटांची संख्या म्हणजेच एकूण ८०० खाटांचे नवीन हॉस्पिटल साकारण्याचा संकल्प आहे. अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने आमदार खोडके यांनी पुढाकार घेतला आहे. डफरीन परिसरात इर्विनसाठी ४०० खाटांचे रुग्णालय थाटण्यात येणार आहे. यासंदर्भात आमदार खोडके यांनी आरोग्य प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेसोबत जागेची ऑन दी स्पॉट पाहणी केली.

यावेळी आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण साळुंके, सुपरचे कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, जिल्हा स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, अधीक्षक वैद्यकीय अधिकारी -तलत खान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रूपा राऊळ-गिरासे, उपविभाग क्रमांक-१ चे उपविभागीय अभियंता तुषार काळे, उप-विभागीय अभियंता श्रीकृष्ण गोमकाळे, शाखा अभियंता एन. प्रकाश रेड्डी, कनिष्ठ अभियंता पी. आर. गोधे, ईर्विनचे कनिष्ठ लिपिक राजू सानप, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कार्यालयीन अधीक्षक स्मिता नंदागवळी, सहाय्यक अधिक्षक रवींद्र तुरे,कनिष्ठ लिपिक तुळजागीर गिरी, रवींद्र मेटकर, नितीन बोरकर, स्वाती चांदोरे, वंदना चव्हाण, पल्लवी बोबडे, अधिसेविका-जया सौदागरे,कल्पना टवलारे, पदमा खंडाते आदी उपस्थित होते .
 
सद्या इर्विनमध्ये वाढता रुग्णसेवेचा व्याप सांभाळताना आरोग्य यंत्रणेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे ८०० बेडचे नवीन हॉस्पिटल साकारण्याचा संकल्प केला असून मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणीनुसार शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
 - सुलभा खोडके, आमदार

Web Title: Amravati: Amravati's Irwin' will be a new 800-bed hospital; Vision of strengthening, expanding patient care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.