Amravati: बीटी बियाणांचा काळाबाजार, कारवाई केव्हा?, कृषी सहायकांच्या उपस्थितीत मिळतात दोन पाकिटे

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 24, 2024 09:57 PM2024-05-24T21:57:53+5:302024-05-24T21:59:01+5:30

Amravati News: हंगामापूर्वीच बीटी कपाशीच्या मागणी असलेल्या काही वाणांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या निगराणीत एका शेतकऱ्याला बियाणाचे दोन पाकीट असे वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही दुकानदार वाढीव दराने विक्री करीत असल्याचेही समोर आले आहे.

Amravati: Black market of Bt seeds, action when?, two packets received in presence of agricultural assistants | Amravati: बीटी बियाणांचा काळाबाजार, कारवाई केव्हा?, कृषी सहायकांच्या उपस्थितीत मिळतात दोन पाकिटे

Amravati: बीटी बियाणांचा काळाबाजार, कारवाई केव्हा?, कृषी सहायकांच्या उपस्थितीत मिळतात दोन पाकिटे

- गजानन मोहोड 
अमरावती - हंगामापूर्वीच बीटी कपाशीच्या मागणी असलेल्या काही वाणांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या निगराणीत एका शेतकऱ्याला बियाणाचे दोन पाकीट असे वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही दुकानदार वाढीव दराने विक्री करीत असल्याचेही समोर आले आहे. शेतकऱ्यांची तक्रार नसल्याने कृषी विभागाद्वारा अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे.

यंदाचा खरीप हंगाम काही दिवसांवर आलेला असल्याने शेतकऱ्यांद्वारा बियाणे, खतांची खरेदी सुरू झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांची अधिक मागणी असलेल्या काही बीटी बियाणांचा तुटवडा मार्केटमध्ये निर्माण झालेला आहे. सदर कंपनीकडे अडीच लाखांवर पाकिटांची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर जिल्ह्यासाठी फक्त ६५ हजार पाकिटांचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे व त्यातील काही पुरवठादेखील शहरासह काही तालुक्यांना करण्यात आलेला आहे.
मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी व उशिरा झाल्याने व काही दुकानातच पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांच्या अन् कृषी विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अधिकतम शेतकऱ्यांना बियाणे मिळावे, यासाठी एका शेतकऱ्याला दोन बियाणे पाकिटांची विक्री करण्यात येणार असल्याचे कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर यांनी सांगितले.
 
प्रत्येक केंद्रात कृषी सहायकांची नियुक्त
बीटीच्या विशिष्ट वाणांचा तुटवडा असल्याने ज्या ठिकाणी कृषी केंद्रात बियाणांचा पुरवठा झालेला आहे, अशा केंद्रांमध्ये कृषी सहायकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे व त्यांच्या उपस्थितीत एक शेतकऱ्याला दोन पाकिटांची विक्री करणे सुरू करण्यात आले आहे. अशा दुकानातील अपडेट स्टॉक बोर्डावर नमूद करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
 
ग्रामीणमध्ये बियाणांचे दर दामदुप्पट
केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार बीटी बियाणांच्या पाकिटाची एमआरपी ८६७ रुपये आहे. ग्रामीणमध्ये ९०० ते १२०० रुपयांप्रमाणे विक्री होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांनाच बियाणांची आवश्यकता असल्याने त्यांच्याद्वारा तक्रार झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे भरारी पथकाद्वारा अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
 
मागणीच्या तुलनेत कमी आवंटन प्राप्त आहे. त्या विशिष्ट वाणाचे बियाणांचा पुरवठा उशिराने झाला व कमी झाला. बियाणे उपलब्ध असलेल्या दुकानात कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली व त्यांच्या देखरेखीमध्ये विक्री सुरू आहे.
- राहुल सातपुते
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
 
सर्व तालुक्यातील भरारी पथकांचा बियाणे विक्रीवर वॉच आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे. शिवाय प्रत्येक दुकानात कृषी सहायक आहेत. बियाणे विक्रीसोबतच लिंकिंग होऊ नये, यावर त्यांचा वॉच आहे.
- अजय तळेगावकर, कृषी विकास अधिकारी (जि.प.)

Web Title: Amravati: Black market of Bt seeds, action when?, two packets received in presence of agricultural assistants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.