अमरावती केंद्रातून ‘कु.सौ. कांबळे’ अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:16 PM2017-12-02T23:16:59+5:302017-12-02T23:17:17+5:30

शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या ५७ व्या महाराष्टÑ राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अमरावती केंद्रस्तरीय प्राथमिक फेरीत अंबापेठ क्लब (अमरावती) च्या ‘कु.सौ. कांबळे’ या नाट्यप्रयोगाने प्रथम पारितोषिक पटकावत अंतिम फेरी गाठली.

Amravati Center 'Ku. Sou. Kamble 'tops | अमरावती केंद्रातून ‘कु.सौ. कांबळे’ अव्वल

अमरावती केंद्रातून ‘कु.सौ. कांबळे’ अव्वल

Next
ठळक मुद्दे‘सत्यदास’ही अंतिम फेरीत : ५७ वी महाराष्टÑ राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या ५७ व्या महाराष्टÑ राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अमरावती केंद्रस्तरीय प्राथमिक फेरीत अंबापेठ क्लब (अमरावती) च्या ‘कु.सौ. कांबळे’ या नाट्यप्रयोगाने प्रथम पारितोषिक पटकावत अंतिम फेरी गाठली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये नाट्यभारती (इंदूर) या संस्थेच्या ‘सत्यदास’ या नाट्यप्रयोगाने द्वितीय पारितोषिक मिळविले. त्यांचीही अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. वेल अ‍ॅन्ड वेल पब्लिक एज्युकेशन सोसायटी (इंदूर) ला ‘अचानक’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक विशाल तराळ (नाटक - कु.सौ. कांबळे), द्वितीय पारितोषिक श्रीराम जोग (सत्यदास), प्रकाश योजनेसाठी प्रथम पारितोषिक अभिजित कळमकर (सत्यदास), द्वितीय पारितोषिक दीपक नांदगावकर (तीस तेरा), नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक प्रशांत देशपांडे (कु.सौ. कांबळे), द्वितीय पारितोषिक अनिरुद्ध किरकिरे (सत्यदास), रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक मंजूश्री भोगले (अचानक), द्वितीय पारितोषिक दीपाली दाते (सत्यदास), उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक श्रीकांत भोगले (अचानक) व रसिका वानखडे-वडवेकर (कु.सौ. कांबळे), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रतीक्षा बेलसरे (सत्यदास), प्रांजल डाखोडे (तीस तेरा), सागरिका मराठे (अचानक), पयोष्णी ठाकूर (तीस तेरा), मनोज पटेरिया (वाटा पळवाटा), विशाल तराळ (कु.सौ. कांबळे), अभिनय देशमुख (पैसा झाला खोटा), रावसाहेब काळे (लांबजाना) यांना पुरस्कृत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात १३ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. संजय गणपुले, अनघा घोडपकर आणि अरविंद लिमये यांनी परीक्षण केले.

Web Title: Amravati Center 'Ku. Sou. Kamble 'tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.