Amravati: जप्तीमधील २.३९ कोटींचे रासायनिक खत दुय्यम दर्जाचे, माहुली जहागीरच्या अनधिकृत गोदामातून जप्त केला होता साठा
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 3, 2023 04:44 PM2023-09-03T16:44:33+5:302023-09-03T16:47:14+5:30
Amravati News: माहुली जहागीर (ता. अमरावती) येथील अनधिकृत गोदामात कृषी व पोलिस विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आलेले २.३९ कोटींचे रासायनिक खत दुय्यम दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- गजानन मोहोड
अमरावती - माहुली जहागीर (ता. अमरावती) येथील अनधिकृत गोदामात कृषी व पोलिस विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आलेले २.३९ कोटींचे रासायनिक खत दुय्यम दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या खतांचे नमुने तपासणीला प्रयोगशाळेत पाठविले असता काही नमुन्यांचा अहवाल आता कृषी विभागाला प्राप्त झालेला आहे.
गोदामातून विविध १२ प्रकारच्या कंपनीचे ११,७६९ हजार बॅग रासायनिक व जैविक खत १८ ऑगस्टला जप्त करण्यात आले होते. या कारवाईत २,३८,९९,७१३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता व नमुने येथीलच प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले होते. काही नमुन्यांमध्ये संबंधित रसायनाची मात्रा कमी प्रमाणात आहे. अद्याप काही नमुन्यांचे अहवाल बाकी असल्याचे विभागीय कृषी सहसंचालकांनी सांगितले.