अमरावतीत अवघ्या दहा दिवसांच्या चिमुकल्याची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:18+5:302021-05-20T04:14:18+5:30

होप हॉस्पिटल, डॉक्टरांच्या चमूने केला यशस्वी उपचार, आज परतणार कुटुंबात अमरावती/ संदीप मानकर : जन्मल्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशी कोरोना ...

In Amravati, Chimukalya defeated Corona in just ten days | अमरावतीत अवघ्या दहा दिवसांच्या चिमुकल्याची कोरोनावर मात

अमरावतीत अवघ्या दहा दिवसांच्या चिमुकल्याची कोरोनावर मात

Next

होप हॉस्पिटल, डॉक्टरांच्या चमूने केला यशस्वी उपचार, आज परतणार कुटुंबात

अमरावती/ संदीप मानकर : जन्मल्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशी कोरोना संक्रमित झालेल्या चिमुकल्याने या आजारावर मात केली आहे. दोन आठवड्यांच्या उपचाराअंती डॉक्टरांनी त्याला मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणले. तो राज्यातील सर्वात कमी वयाचा कोरोना संक्रमित शिशू असल्याचा दावा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. गुरुवारी त्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो कुटुंबात परतणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, वरूड तालुक्यातील अंबाडा येथील अपेक्षा मरस्कोल्हे या महिलेने १६ एप्रिल २०२१ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. जन्माच्या दोन दिवसांतच या नवजाताला सतत ताप येत असल्यामुळे त्याच्या वडिलांनी वरूड शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याला उपचाराकरिता दाखल केले. तेथे

तीन दिवसांच्या उपचारानंतर बाळाला घरी आणण्यात आले. मात्र, त्याला परत तीव्र ताप येत असल्याने त्याच रुग्णालयात बाळावर पुढील सात दिवस उपचार करण्यात आला.

सततचे तापामुळे डॉक्टरांनी वेळीच त्याची कोरोनासंबंधी आरटीपीसीआर चाचणी केली. २८ एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आई-वडील निगेटिव्ह होते. घाबरलेल्या आई-वडिलांनी धीर खचू न देता त्याला अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यानच्या काळात श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याने त्याच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू केला. मात्र, व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक उपचारांची गरज आणि आयसीयू बेडची कमतरता यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात त्याला शहरातीलच होप रुग्णालय दाखल करण्यात आले. येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर अद्वैत पानट यांच्या मार्गदर्शनात त्याच्यावर उपचार सुरू केला. संपूर्ण मजला उपचारासाठी आरक्षित करून त्याला आयसीयूमध्ये परिवर्तित करण्यात आले.

बॉक्स

असा झाला उपचार

श्वसनाचा त्रास वाढतच असल्यामुळे बाळाला तीन दिवसांपर्यंत अत्याधुनिक सीपीएपी मशीनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला. रक्त, प्लाझ्मा, औषधांचा पुरवठा तसेच रक्त तपासणी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामार्फत होत होती. दरम्यानच्या काळात प्रकृती ढासळत असल्याने डॉक्टर अद्वैत व शासकीय आरोग्य यंत्रणा यांनी रेमडेसिविर सुरू केले. बहुदा हे इंजेक्शन मिळणारे हे बाळ महाराष्ट्रात किंवा भारतात प्रथम असावे, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. रेमडेसिविर व हाय फ्लो ऑक्सिजनच्या परिणामी पाच दिवसांनंतर श्वसनात सुधार दिसू लागला. ताप कमी होत होता. इंटेन्सिव्ह उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिरावली. अठराव्या दिवशी बाळाच्या कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्याची गरज संपली, त्या दिवशी आईच्या चेहर्‍यावर हास्य फुलले.

बॉक्स

नातेवाइकांनी मानले डॉक्टरांचे आभार!

एवढ्या कमी दिवसांच्या बाळाला कोविडमधून बरे करण्याचे आवाहन डॉक्टर अद्वैत पानट व होप हॉस्पिटलच्या चमूने स्वीकारून ते पूर्णत्वास नेले. याबद्दल बाळाच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी डॉक्टरांचे आभार मानले.

कोट

बाळ दोन दिवसांचे असताना त्याला कोरोनाची लागण झाली असावी. दहाव्या दिवशी त्याचे निदान झाले. आता २४ दिवसानंतर तो बरा झाल्याचा आनंद आहे. तो राज्यातील सर्वांत कमी वयाचे कोरोनावर मात करणारा शिशू ठरला आहे.

- अद्वैत पानट, नवजात शिशुतज्ज्ञ

Web Title: In Amravati, Chimukalya defeated Corona in just ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.